जालन्याची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी
By Admin | Updated: June 13, 2017 00:59 IST2017-06-13T00:58:43+5:302017-06-13T00:59:58+5:30
जालना : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात जालन्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अनुभव ट्रस्टचे डॉ. मोहन कुलकर्णी यांनी केले.

जालन्याची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात जालन्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अनुभव ट्रस्टचे डॉ. मोहन कुलकर्णी यांनी केले.
पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील अनुभव प्रतिष्ठानतर्फे सोमवारी सायंकाळी फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ‘पुल’ कित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक, अभिनेता संदेश कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अनुभव प्रतिष्ठानच्या संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी म्हणाले, की अनुभव ट्रस्ट न्यूयार्कच्या माध्यमातून जगभरात साहित्य व सांस्कतिक चळवळीशी निगडित कार्यक्रम घेतले जातात. मराठवाड्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे येथील साहित्यप्रेमींशी झालेल्या चर्चेतून जाणवले. त्यामुळेच अनुभव ट्रस्ट जालन्यात आले. जालन्यातील साहित्यप्रेमी नागरिक व प्रेक्षकांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी तशा सूचना अनुभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराव्यात. त्यानुसार बदल करत येथील सांस्कृतिक चळवळ वाढवतो येईल, असे सागंून त्यांनी मास्टर कृष्णराव फुलंंब्रीकर, केशवराव भोसले यांच्या नाट्य प्रयोगातील काही प्रसंग प्रेक्षकांना सांगितले. संजीवनी तडेगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करत डॉ. मोहन कुलकर्णी व अभिनेता संदेश कुलकर्णी यांचा परिचय करून दिला.