क्रेन विहिरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

By Admin | Updated: April 19, 2015 00:45 IST2015-04-19T00:30:49+5:302015-04-19T00:45:54+5:30

जालना : घनसावंगी तालुक्यातील कोठाळा शिवारात गट क्र. ६३ मध्ये एका विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु असताना क्रेन विहिरीत कोसळून एक मजूर ठार झाला

A crane collapsed well in the well, three injured | क्रेन विहिरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

क्रेन विहिरीत कोसळून एक ठार, तीन जखमी


जालना : घनसावंगी तालुक्यातील कोठाळा शिवारात गट क्र. ६३ मध्ये एका विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु असताना क्रेन विहिरीत कोसळून एक मजूर ठार झाला. तर त्याचे तीन सहकारी जखमी झाले. ही घटना १७ एप्रिल रोजी दुपारी घडली.
कोठाळा शिवारात जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. त्यावेळी दिपक धर्मा कोर (रा.कोठी, ता.घनसावंगी) याने क्रेन मशिन हलगर्जीपणाने चालविल्याने क्रेन विहिरीत कोसळून भिकू जगन्नाथ बहीर हा मजूर ठार झाला. तर त्यांचे सहकारी श्रीराम बहीर, अशोक बतमारे, पांडुरंग बहीर हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने औषधोपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी जनार्धन रावसाहेब बहीर (रा. गणेशनगर, घनसावंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घनसावंगी पोलिस ठाण्यात आरोपी दिपक कोर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत असल्याचे ठाण्यातील पोलिस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: A crane collapsed well in the well, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.