करंजखेड घाटातील दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:37 IST2016-07-13T00:15:21+5:302016-07-13T00:37:28+5:30

करंजखेड : गत ५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी (दि.११) रात्री करंजखेड घाटातील दरड कोसळली.

The cracks in Karanjkhad valley collapsed | करंजखेड घाटातील दरड कोसळली

करंजखेड घाटातील दरड कोसळली


करंजखेड : गत ५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी (दि.११) रात्री करंजखेड घाटातील दरड कोसळली. यामुळे कन्नड-पिशोर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहनधारकांना अडचणीला सामोरे जावे लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, करंजखेड परिसरात गत ५ ते ६ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सोमवारी (दि.११) मध्यरात्री करंजखेड घाटातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दरड कोसळली. ऐन रस्त्यांच्या मधोमध मोठमोठे दगड पडल्यामुळे कन्नड-पिशोर मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती.
हा मार्ग बंद झाल्यामुळे कन्नडला जाणाऱ्या प्रवाशांना गौताळा, रामपूरवाडी, तर पिशोरला जाणाऱ्या वाहनधारकांना नाचनवेलमार्गे प्रवास करावा लागला. दरम्यान, करंजखेड घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सचिन पवार यांनी सदर घटनेची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन काजे यांना दिली.
काजे यांनी मंगळवारी (दि.१२) सकाळी त्वरित जेसीबीला पाचारण करून युद्धपातळीवर या घाटात दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर अखेर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास या घाटातून वाहतूक सुरू झाली होती.

Web Title: The cracks in Karanjkhad valley collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.