शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटच्या पाणीपुरवठा योजनेत लबाडी

By admin | Updated: February 2, 2016 00:28 IST

चेतन धनुरे , उदगीर गतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़

चेतन धनुरे , उदगीरगतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़ ही योजना रावणकोळा तलावातून मंजूर करुन घेतली असली तरी ती प्रत्यक्ष माळहिप्परगा तलावातून सुरु आहे़ त्यामुळे येथील पाणी वापर संस्थेच्या सभासदांनी त्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्याने झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई संस्थेकडे मागितली आहे़ जळकोट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने येथे पूरक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती़ १ कोटी ४२ लाख ६१ हजार ९०० रुपये किंमतीच्या या योजनेसाठी जि़प़च्या सहाय्यक भूवैज्ञानिकांनी रावणकोळा साठवण तलावाची शिफारस केली होती़ परंतु, प्रत्यक्षात अधिकारी व ठेकेदारांनी मिळून ही योजना त्यापेक्षा जवळच्या माळहिप्परगा तलावातून राबविल्याचा आरोप येथील कालीमाता पाणीवापर सहकारी संस्थेने केला आहे़ या माध्यमातून जलवाहिनीचे अंतर कमी करुन त्यात आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचाही आरोप या संस्थेचा आहे़ माळहिप्परगा येथील साठवण तलावात शिवाजीनगर तांड्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आलेली विहीर अस्तित्वात आहे़ त्यावर कालांतराने रावणकोळा व माळहिप्परगा गावासाठी तात्पुरत्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ आता मागच्या वर्षी याच विहिरीतून जळकोट शहरासाठी योजना राबविण्यात आली आहे़ त्यामुळे जळकोटचा पाणीप्रश्न मार्गी लागला असला तरी या तलावावरील शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे़ त्यामुळे ऐन टंचाई काळात नव्याच वादाला तोंड फुटले आहे़ माळहिप्परगा येथील कालीमाता पाणीवापर संस्थेने माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत एकाच विभागाने विसंगत दोन उत्तरे दिल्याचे निदर्शनास आले आहे़ जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या कागदपत्रामध्ये ही योजना रावणकोळा साठवण तलावातील विहिरीवरुन असल्याचे प्रपत्र ब मध्ये नमूद करण्यात आले आहे़ हेच प्रपत्र ब याच विभागाच्या जळकोट येथील उपविभागीय अभियंता कार्यालयातून घेतले असता त्यावर खाडाखोड करुन माळहिप्परगा साठवण तलाव केल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अधिकाऱ्यांनीच शब्दच्छल करुन योजनेत लबाडी केल्याचा आरोप होत आहे़