जळकोटच्या पाणीपुरवठा योजनेत लबाडी

By Admin | Updated: February 2, 2016 00:28 IST2016-02-02T00:22:31+5:302016-02-02T00:28:08+5:30

चेतन धनुरे , उदगीर गतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़

Cracking water supply scheme | जळकोटच्या पाणीपुरवठा योजनेत लबाडी

जळकोटच्या पाणीपुरवठा योजनेत लबाडी


चेतन धनुरे , उदगीर
गतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या जळकोट शहराच्या पूरक पाणीपुरवठा योजनेत अधिकाऱ्यांनी शाब्दिक चलाखी करीत लबाडी केल्याचा आरोप माळहिप्परगा साठवण तलावावरील शेतकऱ्यांनी केला आहे़ ही योजना रावणकोळा तलावातून मंजूर करुन घेतली असली तरी ती प्रत्यक्ष माळहिप्परगा तलावातून सुरु आहे़ त्यामुळे येथील पाणी वापर संस्थेच्या सभासदांनी त्यांच्या पिकांना पाणी न मिळाल्याने झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई संस्थेकडे मागितली आहे़
जळकोट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने येथे पूरक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती़ १ कोटी ४२ लाख ६१ हजार ९०० रुपये किंमतीच्या या योजनेसाठी जि़प़च्या सहाय्यक भूवैज्ञानिकांनी रावणकोळा साठवण तलावाची शिफारस केली होती़ परंतु, प्रत्यक्षात अधिकारी व ठेकेदारांनी मिळून ही योजना त्यापेक्षा जवळच्या माळहिप्परगा तलावातून राबविल्याचा आरोप येथील कालीमाता पाणीवापर सहकारी संस्थेने केला आहे़ या माध्यमातून जलवाहिनीचे अंतर कमी करुन त्यात आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचाही आरोप या संस्थेचा आहे़
माळहिप्परगा येथील साठवण तलावात शिवाजीनगर तांड्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आलेली विहीर अस्तित्वात आहे़ त्यावर कालांतराने रावणकोळा व माळहिप्परगा गावासाठी तात्पुरत्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ आता मागच्या वर्षी याच विहिरीतून जळकोट शहरासाठी योजना राबविण्यात आली आहे़ त्यामुळे जळकोटचा पाणीप्रश्न मार्गी लागला असला तरी या तलावावरील शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे़ त्यामुळे ऐन टंचाई काळात नव्याच वादाला तोंड फुटले आहे़
माळहिप्परगा येथील कालीमाता पाणीवापर संस्थेने माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत एकाच विभागाने विसंगत दोन उत्तरे दिल्याचे निदर्शनास आले आहे़ जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या कागदपत्रामध्ये ही योजना रावणकोळा साठवण तलावातील विहिरीवरुन असल्याचे प्रपत्र ब मध्ये नमूद करण्यात आले आहे़ हेच प्रपत्र ब याच विभागाच्या जळकोट येथील उपविभागीय अभियंता कार्यालयातून घेतले असता त्यावर खाडाखोड करुन माळहिप्परगा साठवण तलाव केल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अधिकाऱ्यांनीच शब्दच्छल करुन योजनेत लबाडी केल्याचा आरोप होत आहे़

Web Title: Cracking water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.