गोवंश हत्या; तिघांना रंगेहाथ पकडले
By Admin | Updated: November 19, 2015 00:25 IST2015-11-18T23:49:50+5:302015-11-19T00:25:36+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एका घरात गोवंशाची हत्या करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.

गोवंश हत्या; तिघांना रंगेहाथ पकडले
अंबाजोगाई : तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एका घरात गोवंशाची हत्या करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून केलेल्या कारवाईत १५० किलो मांसासह तिघांना रंगेहाथ पकडून गजाआड करण्यात आले.
लोखंडी सावरगाव येथील अफजल अलीशेर कुरेशी यांच्या बसस्थानकामागील घरात गोवंश हत्या करण्यात येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह घरावर अचानक छापा मारला असता पांढऱ्या रंगाच्या खिल्लारी बैलाची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले.
यावेळी घटनास्थळी सदरील बैलाचे १५० किलो मांस, बैलाची हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड व इतर अवजारांसह अजबल अलीशेर कुरेश (वय २६), काशीम अलिशेर कुरेशी (वय ३४) व दस्तगीर अलीशेर कुरेशी (वय २८) या तिघांना घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.
गोवंशांचे मांस जप्त करण्यात आल्यानंतर शासकीय पशुचिकित्सा अधिकारी यांच्याकडून या मांसाची तपासणी करून रीतसर अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर वरील तिघांविरोधात कलम ५ ब, क, ९ अ महाराष्ट्र प्राणी परीक्षण (सुधारणा) कायदा १९९५ व कलम ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० व ३४ भादंवि या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक चंद्रशेखर चौधरी करीत आहेत. (वार्ताहर)