ढेकरीतील विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: July 4, 2016 00:14 IST2016-07-04T00:02:17+5:302016-07-04T00:14:26+5:30
तुळजापूर : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ढेकरी शिवारात ३ जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

ढेकरीतील विवाहितेची आत्महत्या
तुळजापूर : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ढेकरी शिवारात ३ जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढेकरी येथील जयश्री ऊर्फ गंगा चंद्रकांत मुंडे या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून १ ते ३ जुलै या कालावधीत माहेराहून पैसे घेऊन ये म्हणून छळ करण्यात आला. यास कंटाळून जयश्री ऊर्फ गंगा मुंडे यांनी रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद मकरध्वज खंडू बोंदर (रा. उतमी कायापूर) यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली.
यावरुन मयत विवाहितेचा पती चंद्रकांत दादाराव मुंडे, सावरत्र मुलगा राम आणि श्रावण तसेच श्रावणची पत्नी व जावई विनोद कराडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष जोंधळे करीत आहेत. यानंतर पोलिसांनी कारवाई करून पाचही जणांना अटक केली आहे. (वार्ताहर)