शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:37 IST

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी युवकाला फसवणारी टोळी उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत बनावट लग्न करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न एका महिलेच्या माध्यमातून मुलीच्या मावशीने जमवले. त्यासाठी रोख पैशांसह सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज घेतला. न्यायालयातून सासरी निघालेल्या नवरीने रस्त्यातूनच महागड्या गाडीतून धूम ठोकल्याचा प्रकार २४ सप्टेंबर रोजी घडला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांच्या विरोधात १८ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

ज्योती राजू गायकवाड (बोगस नाव ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), माया मधुकर शिंदे आणि सविता मधुकर शिंदे (रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील फिर्यादी शेतकरी पत्नी व दोन मुलांसह शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महेश (नाव बदलले) याच्या लग्नासाठी मुलगी पाहिली जात होती. तेव्हा शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेने ओळखीतील मुलगी असल्याचे सांगितले. फोटो, बायोडेटा मागवल्यानंतर मुलगी पसंत असल्यामुळे पुढच्या बोलणीसाठी मुलीची मावशी म्हणून आरोपी ज्योती गायकवाड हिचा नंबर दिला. त्यानुसार फिर्यादीसह महेश आणि इतर कुटुंबीय २३ सप्टेंबरला सिडको एन -६ भागात ज्योतीच्या घरी आले. तिथे ज्योती, रेखा मिसाळ व नवरी मुलगी माया हजर होत्या. मुलीच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची थाप मारली. 

मुलगी व तिचे कुटुंब पाहिल्यानंतर फिर्यादींना मुलगी पसंत आली. तेव्हा आरोपींनी मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढत तिच्या उपचारासाठी व दागिन्यांसाठी १.८० लाखांची मागणी केली. तसेच लग्न कोर्ट मॅरेजद्वारे करायचे ठरले. त्यासाठी आरोपींनी वकिलाला पाच हजार पाठवायला लावले. त्यानंतर १ लाख रोख, ३० हजार फोन पेद्वारे, ५० हजार मित्रामार्फत आणि १ लाख ७९ हजारांचे सोन्याचे दागिने असे एकूण ३ लाख ८६ हजारांचा व्यवहार केला. कपडे व भेटवस्तूंसाठी १० हजार खर्च केले. २४ सप्टेंबर रोजी सकाळी सर्व मंडळी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी जमली. तलवार नावाच्या वकिलाने मुला-मुलीची कागदपत्रे घेतली व फी म्हणून १२ हजार घेतले. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन कुटुंबीय गावाकडे निघाले. शहराच्या बाहेर पडल्यानंतर हॉटेलवर कुटुंब चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्याचक्षणी एक पांढऱ्या रंगाची विनाक्रमांक स्कॉर्पिओ गाडी आली आणि मुलगी माया शिंदे अचानक त्या गाडीत बसून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बदनामीमुळे तक्रार थांबवलीघटना घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने शेतकरी कुटुंबाने तक्रार दिली नाही. मात्र, काही दिवसांनी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी पकडल्याचे समाेर आले. तेव्हा फिर्यादींनी नातेवाईकाला सोबत घेत कोपरगावला जाऊन शहानिशा केली. तेव्हा फिर्यादीला फसवणाऱ्याच महिला असल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादीने छत्रपती संभाजीनगर गाठत सिडको पोलिस ठाण्यात पो. नि. अतुल येरमे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bride flees after court marriage, another farmer's son defrauded!

Web Summary : A groom from Nashik was duped of ₹3.86 lakhs in a fake marriage scheme. The bride fled after the court marriage during a tea break. Police are investigating the fraud.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नfraudधोकेबाजी