साजापुरात दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:02 IST2021-05-18T04:02:12+5:302021-05-18T04:02:12+5:30
वाळूज महानगर : साजापुरात वाड्याच्या गेटला कुलूप का लावले, या किरकोळ कारणावरुन दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या चौघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ...

साजापुरात दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
वाळूज महानगर : साजापुरात वाड्याच्या गेटला कुलूप का लावले, या किरकोळ कारणावरुन दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या चौघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश पारसिंग राजपूत (३२) हे कुटुंबासह साजापुरात राहतात. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राजेश घरी असताना, ममता प्रजापती यांनी राजपूत यांच्या वाड्याच्या गेटला कुलूप लावले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेशची पत्नी नीलूकुमारी यांनी ममता यांना जाब विचारताच या दोघींत वाद झाला. हा वाद सुरु असताना राजेश यांची पत्नी नीलूकुमारी या ममता यांना समजावून सांगत असताना, ममताचे पती अजय व रश्मी प्रजापती व नीतू प्रजापती यांनी नीलूकुमारी यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर अजयने राजेश यांच्या डोक्यात दगड मारला. याप्रकरणी राजेश राजपूत यांच्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.