देशी कट्टा विक्रेत्या तरुणाला अटक

By Admin | Updated: September 29, 2014 00:47 IST2014-09-29T00:47:43+5:302014-09-29T00:47:43+5:30

औरंगाबाद : अवैध शस्त्रांच्या तस्करीचे प्रकार जोरात सुरू असून, आज पुन्हा शहरात गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी शहरात आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली.

The country's strap-on shopman arrested | देशी कट्टा विक्रेत्या तरुणाला अटक

देशी कट्टा विक्रेत्या तरुणाला अटक

औरंगाबाद : अवैध शस्त्रांच्या तस्करीचे प्रकार जोरात सुरू असून, आज पुन्हा शहरात गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी शहरात आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक कार, असा सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संभाजी शेषराव नागोडे (३०, रा.दिघी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या शस्त्र तस्कर तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानाधारकांकडून शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच शहरातील गल्लीदादांना जेलमध्ये पाठविले आहे.
नेवासा येथील एक तरुण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांना मिळाली. खंडागळे यांनी पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या तरुणास पकडण्यासाठी तयारी केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नगर रोडवरील वाळूज गावापासून काही अंतरावर असलेल्या दावत हॉटेलसमोर बॅरिकेडस् लावून वाहन तपासणी सुरू केली.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून शहराकडे येत असलेली इंडिका कार क्रमांक एमएच-१४ एक्स-३७१ थांबविली. कारचालकास खाली उतरवून त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले.
त्याच्या तातडीने मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून हे प्राणघातक शस्त्र आणि कार हस्तगत करण्यात आली. त्यास गुन्हे शाखेत नेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

Web Title: The country's strap-on shopman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.