...तर देश महासत्ता होईल-मोरे
By Admin | Updated: October 27, 2015 00:18 IST2015-10-27T00:00:18+5:302015-10-27T00:18:35+5:30
जालना : देश भ्रष्टाचार मुक्त झाल्यास जगात महासत्ता राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्याची शपथ घ्यावी

...तर देश महासत्ता होईल-मोरे
जालना : देश भ्रष्टाचार मुक्त झाल्यास जगात महासत्ता राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्याची शपथ घ्यावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रविण मोरे यांनी केले.
येथील सरस्वती भूवन शाळेत दक्षता जागृती अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी शालेय संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. रावसाहेब देशपांडे, सचिव प्रा. राम भाले, मुख्याध्यापक केशरसिंग बगेरीया आदींची उपस्थिती होती. यावेळी पूढे बोलताना मोरे म्हणाले, विद्यार्थी देशाची ताकद आहे. तेव्हा बालवयापासूनच भ्रष्टाचार करणार नाही. किंवा होवू देणार नाही याची शपथ घेवून त्याबाबत ठाम भूमीका घेतल्यास भारत देश भ्रष्टाचार मुक्त होवून जगात महासत्ता म्हणून ओळख निर्माण होईल असे सांगितले. यावेळी भ्रष्टाचारामुळे होणारे दुष्पपरिणाम यावर चर्चासत्र घेण्यात आले. तसेच दक्षता जागृती सप्ताहातंर्गत वाद- विवाद, व्याख्यान, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्यासाठी शपथ घेतली. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)