देशपातळीवरील दंत ‘डेंटल’च्या मूळ जागा कायम राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:43 IST2016-06-25T00:16:23+5:302016-06-25T00:43:31+5:30

औरंगाबाद : वाढीव दहा जागांवरील प्रवेशास मान्यता न देण्याच्या शिफारशींचा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मूळ जागांवरील

Country-wide dental dental will remain the last place | देशपातळीवरील दंत ‘डेंटल’च्या मूळ जागा कायम राहणार

देशपातळीवरील दंत ‘डेंटल’च्या मूळ जागा कायम राहणार


औरंगाबाद : वाढीव दहा जागांवरील प्रवेशास मान्यता न देण्याच्या शिफारशींचा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मूळ जागांवरील प्रवेशावर कसलाही परिणाम होणार नाही, असे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी कळविले आहे.
दंत परिषदेच्या पथकाने २५ एप्रिल रोजी वाढीव प्रवेश क्षमतेच्या मान्यतेसाठी तपासणी केली होती. त्यानंतर १० मे रोजी पत्र पाठवून त्रुटी कळविल्या होत्या. महाविद्यालयाने त्रुटींबाबतचा अहवाल १८ मे रोजी सादर केला. त्यानंतर पथकाने ७ जून रोजी पुन्हा तपासणी केली. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथे येत्या २७ जून रोजी ठेवण्यात आली आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील १० वाढीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी शिफारस भारतीय दंत परिषदेने केंद्रीय आरोग्य मंत्रालयास केली असली, तरी मूळ जागांवरील प्रवेशांवर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.महाविद्यालयांच्या नुकत्याच कर
ण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १३ वे स्थान पटकावले. परंतु पहिल्या १५ सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांमध्ये समावेश असूनही याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागा पायाभूत सुविधांच्या त्रुटींमुळे कमी करण्याची शिफारस करण्यात आली. अशा परिस्थितीत त्रुटींची पूर्तता करण्याचे आव्हान महाविद्यालयासमोर उभे राहिले आहे. देशभरातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी एका संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली. यासंदर्भात २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १३ वे स्थान प्राप्त केले. अवघ्या काही दिवसांपूर्वीची ही परिस्थिती असताना सुविधांच्या त्रुटींमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दहा जागा घटविण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे त्रुटींची तातडीने पूर्तता न झाल्यास ‘बीडीएस’च्या ५० वरून ४० वर जागा येण्याची शक्यता आहे. भारतीय दंत परिषदेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत विविध त्रुटी आढळल्या. त्यामुळे महाविद्यालयाच्या ‘बीडीएस’च्या १० जागा कमी करण्याचा प्रस्ताव परिषदेने आरोग्य मंत्रालयास दिला. परिणामी ५० ऐवजी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची नामुष्की ओढवली आहे. त्रुटींची पूर्तता केली जाणार असल्याने जागा कमी होणार नसल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. ९९ टक्के त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. राहिलेल्या त्रुटी महिनाभरात पूर्ण होतील. त्यामुळे जागा कमी होणार नाहीत. उलट जागा ५० वरून १०० करण्याचा प्रयत्न आहे, असे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.

Web Title: Country-wide dental dental will remain the last place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.