शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

Uddhav Thackeray : न्यायालयाच्या मार्गदर्शनाची देशाला गरज : मुख्यमंत्री, न्यायसंस्थेच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 7:05 AM

Chief Minister Uddhav Thackeray : मुंबई उच्च न्यायालयासाठी इमारत बांधण्याचे माझेही स्वप्न आहे. त्याची तारीख आपणच ठरवू, असे सांगून ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निमंत्रित केले.

औरंगाबाद : देशाच्या नशिबी पुन्हा पारतंत्र्य, गुलामगिरी येऊ नये असे जर वाटत असेल, तर सर्व न्यायमूर्ती, न्यायाधीश, विधिज्ञांनी देशाला मार्गदर्शन केले पाहिजे. आज पदावर आहेस म्हणजे ‘तुझी मर्जी’ हा तुझा अधिकार होऊ शकत नाही. तुझी मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळे आहेत. हे आम्हाला कुणीतरी सांगायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी न्याय संस्थेच्या व्यासपीठावरून केंद्र शासनावर हल्ला चढविला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उच्च न्यायालयाचे न्यामूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासह सर्वाेच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लोकशाहीत संघराज्य आहे का? ज्या घटनेची शपथ राष्ट्रपतींंसह व्यासपीठावरील सर्व घेतात, त्या घटनेमध्ये नेमके काय लिहिलेले आहे. केंद्राला किती अधिकार आहेत, राज्याला किती अधिकार आहेत. राज्याच्या वर केंद्र सरकार आहे का? घटनानिर्मिती होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारले गेले, घटनेत राज्याचे अधिकार कुठे आहेत, केंद्र सरकारच बॉस होणार का? तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी स्वच्छ शब्दांत सांगितले होते, असे अजिबात होणार नाही. मोजके अधिकार सोडले तर केंद्राएवढेच सार्वभौमत्व राज्यांना आहे.

केंद्राएवढीच ताकद आणि अधिकार राज्याला आहे. परंतु, ते अधिकार आपण वापरतो आहोत का? अधिकारांवर गदा येत आहे का, याचाही विचार आता करावा लागणार आहे. कार्यकारी यंत्रणा, कायदेमंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ असून, त्यांच्यावर जनतेचा न्यायासाठी दबाव आहे. कोणत्याही दबावाने कोलमडतील एवढे कमजोर हे स्तंभ झालेले नसून, यातील एकही स्तंभ कोलमडला तरी लोकशाहीचे कोसळलेले छप्पर पुन्हा उभे करणे अशक्य होईल.

मुंबई उच्च न्यायालयासाठी इमारत बांधण्याचे माझेही स्वप्न आहे. त्याची तारीख आपणच ठरवू, असे सांगून ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निमंत्रित केले. आपल्याच कारकीर्दीत त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजीजू यांनी भाषणात, भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे करीत असल्याचे नमूद केले होते. रिजीजू यांना प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, रिजीजू मी भूमिपूजनावेळी नव्हतो, मात्र झेंडावंदनाला आलो. कदाचित ते भाग्यात असेल.

तक्रारदार गायब; तरीही केस चालून्यायप्रक्रियेच्या तारीख पे तारीखमध्ये सर्वसामान्य पिचला जातो. सामान्यांचा न्यायालयात जाऊन आयुष्य आणि पैसा निघून जातो. १९५८ पासून केस चालू असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. अहो, पण आमच्याकडे तक्रारदारच गायब (पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचे नाव न घेता) आहे; पण तरीही केस चालू आहे. आरोप करून पळून गेला, कुठे गेला माहिती नाही. आरोप केलेत खोडून काढ, चौकशा, धाडसत्र सुरू आहे. ही जी पद्धत आहे, याला कुठेतरी चौकट असली पाहिजे.- उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेN V Ramanaएन. व्ही. रमणा