देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड

By Admin | Updated: March 1, 2016 00:41 IST2016-03-01T00:23:07+5:302016-03-01T00:41:08+5:30

दत्ता थोरे , लातूर ग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे

Country Financing: Eat Gaekwad | देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड

देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड


देश समृध्द करणारा अर्थसंकल्प : खा. गायकवाड

दत्ता थोरे , लातूर
ग्रामीण, कृषी विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देत उद्योगजगतालाही नाराज न करता अर्थसंकल्प सादर झाला असून, वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. ग्रामीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असला तरी अंमलबजावणीवर याचे यश अवलंबून राहणार आहे, अशा प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर व्यक्त झाल्या आहेत.
देशाची मुख्य नस ओळखून विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. टॅक्स वाढविलेले नाहीत. शेती, सिंचन आणि आरोग्य अशा घटनांवर भरीव तरतूद आहे. २०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, ८७ हजार ७५० कोटी ग्रामीण भागाच्या आरोग्यासाठी, एलपीजी लाईन ग्रामीण भागात नेण्याचा संकल्प, ज्येष्ठ नागरिकाला जास्तीच्या ४० हजारासह कुंटुंबासाठी लाखाचा विमा, तीन हजार जेनेरिक औषधांची दुकाने, नवोदयची आणखी ६२ विद्यालये या साऱ्या योजना गरिबांच्या फायद्यासाठी आहेत. व्यसनांची साधने महाग झालीत. स्किल इंडिया आणि डिजिटल साक्षरता मिशनवर भर देण्यात आला आहे, असे खा. डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.
काँग्रेसची नीती सरकारने राबविली : आ. देशमुख
४शेती आणि ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात काँग्रेसचेच धोरण राबविले आहे, याचे मला समाधान आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या ज्या योजनांवर सडकून टिका त्यावर या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. हे समाजवादी धोरण भाजपानेही स्विकारल्याचा आनंद आहे. जीएसटीचे काँग्रेसचे धोरण मान्य केलं तर ते सुध्दा राज्यसभेत मंजूर व्हायला हरकत नाही. त्यांचे म्हणून जे काय मुद्दे होते त्या काळ्या पैशाच्या पैशाबद्दल ते काहीच करु शकले नाहीत. लोक आपल्या खात्यात पडणाऱ्या त्या १५ हजार रुपयांची वाट पाहताहेत. या दुष्काळात ती प्रतीक्षा आणखी गडद होत आहे. कृषी, ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असली, तरी हे सर्व युपीए सरकारातीलच योजना असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी अर्थसंकल्पावर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प उत्तम असून यामुळे जीडीपीत नक्कीच वृध्दी मिळेल. अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्राचा विचार केलेला दिसतो. मुख्यत: भारतासारख्या देशाचा कणा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास आणि शेतीचा विकास या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रेल्वे आणि रस्ते या पायाभूत गोष्टींच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. खरे अर्थकारण हे डिजिटल अर्थकारणाशी जोडून देण्यास देशाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केला आहे. अर्थात ‘सच्चे दिन’ आले की ‘अच्छे दिन’ यायला वेळ लागणार नाही, असे शिवप्रसाद मालू म्हणाले.

Web Title: Country Financing: Eat Gaekwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.