देश परदेश-११ सिंगल्स बातम्या

By | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:54+5:302020-11-28T04:09:54+5:30

अंतराळ छायाचित्र न्यूयॉर्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर यांनी अंतराळातून पृथ्वीचे घेतलेले छायाचित्र ट्वीटरवर टाकल्यानंतर ...

Country Abroad - 11 Singles News | देश परदेश-११ सिंगल्स बातम्या

देश परदेश-११ सिंगल्स बातम्या

अंतराळ छायाचित्र

न्यूयॉर्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर यांनी अंतराळातून पृथ्वीचे घेतलेले छायाचित्र ट्वीटरवर टाकल्यानंतर ते सगळीकडे पसरले. ‘माझा पहिला व्हिडीओ अंतराळातून. ड्रॅगन रेझिलेन्सच्या खिडकीतून पृथ्वीकडे पाहतोय, असे ग्लोव्हर यांनी त्यात म्हटले.

-------------------

नौदलाचे मिग-२९ के

ट्रेनर विमानाला अपघात

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे मिग-२९ के ट्रेनर गुरुवारी समुद्रावर कार्यरत असताना पहाटे पाच वाजता त्याला अपघात झाला. एका पायलटला सुखरूप वर काढण्यात आले तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे, असे नौदलाने म्हटले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

--------------------

..तर दिल्लीतील सर्वांना

कोरोना लस- सुरेश सेठ

नवी दिल्ली : रुग्णालयाचे कर्मचारी आणि परिचारिका यांचा सहभाग असेल तर दिल्लीतील संपूर्ण लोकांना कोरोनाची लस दिली जाऊ शकते, असे राज्याचे लसीकरण अधिकारी सुरेश सेठ यांनी गुरुवारी म्हटले.

आम्ही पूर्ण तयार असून दिल्लीला अशक्त होऊ देणार नाही, असेही सेठ म्हणाले.

----------------

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात

व्हाईट हाऊस सोडेन जर...

वॉशिंग्टन : इलेक्टोरेल कॉलेजने ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अध्यक्षपद निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्या विजयाला दुजोरा दिला तर मी व्हाईट हाऊस रिकामे करीन, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांनी म्हटले. निवडणुकीत फार घोटाळे झाले असल्यामुळे बायडेन यांचा विजय मान्य करणे खूप कठीण आहे, असेही ते म्हणाले.

--------------------

थायलंडच्या राजाविरुद्ध

बँकॉकमध्ये आंदोलन

बँकॉक : सीएम कमर्शियल बँकेच्या मुख्यालयाबाहेर सुमारे १५ हजार लोकशाही आंदोलकांनी एकत्र येऊन थायलंडचे राजे महा वजिरा लाेंगकोर्न यांनी त्यांची या बँकेतील ६० अब्ज डॉलर्सची मालमत्ता सोडून द्यावी अशी मागणी केली. या बँकेत लोंगकोर्न हे सर्वात मोठे भागधारक आहेत.

----------------

दंड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

गोळा करा, रोख नको

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पाेलीस आणि अधिकाऱ्यांनी दंड रोख स्वरुपात गोळा न करता इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले. दंड रुपाने गोळा केलेल्या पैशांचे सरकार काय करते असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.

----------------

नेपाळला भारताकडून

रेमडेसिवीर कुप्यांची भेट

काठमांडू : नेपाळला कोरोनाशी संबंधित मदतीचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या दोन हजार कुप्या भेट दिल्या. श्रृंगला यांचा ही पहिलीच नेपाळ भेट होती.

एकदा कोरोना लस उपलब्ध झाली की, नेपाळला ती प्राधान्याने दिली जाईल, असेही श्रृंगला म्हणाले.

-----------------

श्रीमंत होण्यासाठी बंदी

घातलेल्या नोटांची पूजा

नागौर (राजस्थान) : बंदी घालण्यात आलेल्या नोटांची पूजा केल्याबद्दल एका व्यक्तिला येथे अटक करण्यात आली. तुझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बंदी घालण्यात आलेल्या नोटांची पूजा कर असा सल्ला तांत्रिकाने त्याला दिला होता. ५.२० लाख रूपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या सगळ्या ५०० रूपयांच्या नोटा आहेत. एक लाख रूपये देऊन या चलनातून बाद झालेल्या नोटा त्याने विकत घेतल्या होत्या.

---------------

‘कंडोम्सच्या काही जाहिराती

पोर्न चित्रपटांसारख्या’

चेन्नई : दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कंडोम्सच्या काही जाहिराती या अश्लील चित्रपटांसारख्या (पोर्न) असतात व त्यामुळे युवकांची मानसिकता बिघडते, असे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले. केबल ऑपरेटर्स आणि टीव्ही वाहिन्यांनी अश्लील साहित्य दाखवू नये म्हणून राज्य व केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी करणाऱ्या सार्वजनिक हित याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू असताना हे निरीक्षण नोंदवले गेले.

---------------------

मृतदेह कुत्र्याने चाटला,

दोन कर्मचारी निलंबित

संभाल (उत्तर प्रदेश) : संभाल जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या रुग्णालयात कोणाचेही लक्ष नसलेल्या १५ वर्षांच्या मुलीच्या मृतदेहाला भटका कुत्रा चाटतानाचा २० सेकंदांचा व्हिडीओ गुरुवारी समाजमाध्यमांवर आल्यानंतर निलंबनाची कारवाई झाली. आणीबाणीच्या सेवेतील डॉक्टरकडूनही याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे.

--------------------

शेतातील काडी-कचरा

जाळला, १.९२ लाखांचा दंड

बल्लिया (उत्तर प्रदेश) : बल्लिया जिल्हा प्रशासनाने शेतातील काडी-कचरा जाळण्याच्या ३९ प्रकरणांत १.९२ लाख रूपयांचा दंड ठोठावला, असे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. याबाबत सिकंदरपूर तहसीलचे दोन लेखापाल आणि दोन पंचायत सचिवांवर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.

----------------

Web Title: Country Abroad - 11 Singles News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.