मतमोजणी काळजीपूर्वक करावी लागणार
By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:34+5:302020-11-28T04:06:34+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त ...

मतमोजणी काळजीपूर्वक करावी लागणार
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरूवारी अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.
चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.केंद्रेकर म्हणाले, मतमोजणी प्रक्रियेत अचूकता, गतीचा विचार करावा. प्रत्येकाने जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडावी. उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांनी मतमोजणी प्रक्रिया, कार्यक्रम पत्रिका, कामनिहाय विभागणी व नियुक्त अधिकारी यांची कर्तव्ये, मतमोजणी प्रक्रिया वैध, अवैध मतपत्रिका संबंधी तरतुदी, त्यांची उदाहरणे, मतमोजणीची दुसऱ्या व त्यापुढील फेऱ्यांसंबंधी कायदेशीर तरतुदी, मतमोजणी प्रक्रिया मतपत्रिकेची उदाहरणे याबाबत सादरीकरण केले.
चित्रफितीचे निवडणूक निरीक्षकांकडून कौतुक
औरंगाबाद: पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या चित्रफितेचे कौतुक निवडणूक निरीक्षक बी.वेणूगोपाल रेड्डी यांनी केले. उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी डमी मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तयार केलेली चित्रफित प्रशिक्षणात दाखविण्यात आली. उपायुक्त पराग सोमण, पांडुरंग कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांचे सहकार्य यासाठी लाभले.