बनावट तक्रार; पोलिसांकडून मुकादमाची ‘पोलखोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:01 IST2017-08-12T00:01:54+5:302017-08-12T00:01:54+5:30

साखर कारखान्याकडून घेतलेली उचल बुडवण्याच्या हेतूने चोरट्यांनी रस्त्यात अडऊन लुटल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

Counterfeit complaint; Police outpost 'Polkhol' | बनावट तक्रार; पोलिसांकडून मुकादमाची ‘पोलखोल’

बनावट तक्रार; पोलिसांकडून मुकादमाची ‘पोलखोल’

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : साखर कारखान्याकडून घेतलेली उचल बुडवण्याच्या हेतूने चोरट्यांनी रस्त्यात अडऊन लुटल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी करून बनाव उघडकीस आणला. त्यामुळे तक्रारदारालाच जेलमध्ये जावे लागले. अंमळनेर पोलिसांनी गुरूवारी ऊसतोड मुकदमाची ‘पोलखोल’ केली .
म्हातारदेव अश्रुबा खेडकर (६५ रा.चिंचपूर इजदे, जि.अहमदनगर) असे बनाव करणाºया मुकदमाचे नाव आहे. तो बैल व्यापारीही आहे. खेडकर याने बुधवारी अंमळनेर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार तो ८ आॅगस्ट रोजी बैल खरेदीसाठी राशीन येथे मोटरसायकल वरु न गेला होता. सोबत दोन लाख रूपये होते. व्यवहार न झाल्याने तो कडा-आष्टी मार्गे चिंचोली गडाकडे निघाला होता, मूगगावजवळ रस्त्यात त्यास चार लोकांनी अडवले. मारहाण करून त्याच्याकडील दोन लाख रूपये आणी मोटारसायकल पळविली. घाबरलेल्या अवस्थेत चिंचपूर गाठले. ९ आॅगस्ट रोजी अंमळनेर पोलीस ठाण्यात त्याने अशा आशयाची तक्रार नोंदवली. दिवसा मारहाण करून दोन लाखाची रक्कम मोटरसायकल सह लुटल्याचे प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी उपअधिक्षक डॉ.अभिजीत पाटील यांच्यासह अंमळनेर पोलिसांना तात्काळ तपास लावण्याचे आदेश दिले.
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेरच्या सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक ए.बी.गटकुळ यांनी खेडकर याची ८ आॅगस्टची सर्व माहिती मिळवली. तो घटनेदिवशी राहूरी (जि.अ.नगर)असल्याचे समोर आले. खेडकर यास खाक्या दाखवताच तो पोपटासारखा खरे बोलू लागला. पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याकडून घेतलेल्या उचलीचा तगादा चुकवण्यासाठी खोटी तक्रार केल्याचे त्याने कबुल केले.
जामदार बाप्पासाहेब अर्सुळ यांच्या तक्रारीवरु न खेडकरविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खोट्या तक्रारीच पाटोदा तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.

Web Title: Counterfeit complaint; Police outpost 'Polkhol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.