मोजमाप पुस्तिकांची उलट तपासणी
By Admin | Updated: October 29, 2015 00:17 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:17:48+5:30
जालना : जालना येथील सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध कामांच्या मोजमाप पुस्तीकांची उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे.

मोजमाप पुस्तिकांची उलट तपासणी
जालना : जालना येथील सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध कामांच्या मोजमाप पुस्तीकांची उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत अनेक कामांत त्रुट्या आढळून आहे. दरम्यान असे असले तरी तपासणी केलेल्या पुस्तीका हस्तगत करून त्याद्वारे त्याची बिले तयार करण्यासाठी मोठी धावपळ कार्यालयात सुरू आहे.
सार्वजनीक बांधकाम विभाग उत्तर अतंर्गत करण्यात आलेल्या विविध कामांच्या मोजमाप पुस्तीकांची तपासणी यापूर्वी करण्यात आली होती. त्यात अनेक एमबी गायब झाल्याचे उघड झाले होते. यागायब झालेल्या काही एमबी हस्तगत करून उत्तर विभागाने जालना, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या चार तालुक्यातील कामांच्या मोजमाप पुस्तीका मुख्य अभियंता सार्वजनीक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्या आदेशान्वे कार्यकारी अभियंता जालना यांनी तपासणी करून त्याची उलट तपासणी करण्यासाठी उस्मानाबाद येथील कार्यकारी अभियंता यांच्या कडे सादर केली.
जालना उत्तर विभागाच्या तीन याद्या उस्मानाबाद येथे पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील दोन याद्या उलट तपासणी करून परत आलेल्या आहेत.
तपासणीकरून आलेल्या मोजमाप पुस्तीका हस्तगत करण्यासाठी संबधीत गुत्तेदार धावपळ करीत आहे. तसेच हातात पडलेल्या पुस्तीकेच्या आधारे आपले बिल तयार करण्यासाठी अभियंत्याच्या मागे फिरत असल्याचे चित्र सध्या सार्वजनीक बांधकाम विभागात दिसत आहे. दरम्यान गुत्तेदारांनी बिले काढण्यासाठी गर्दी होत असल्याने अधिकारी कार्यालयातच उपस्थित राहणार नसल्याने त्यांची ही गैरसोय होत आहे.
दरम्यान या संदर्भात कार्यकारी अभियंता बेलापट्टी यांच्याशी संपर्क सांधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. (प्रतिनिधी)
भोकरदन, जाफराबाद , बदनापूर व जालना उत्तर या चारही उपविभागातील मोजमाप पुस्तीकांच्या तपासणीत अनेक त्रुट्या आढळून आलेल्या आहेत. याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी संबधीतांना उपविभागीय अभियंत्यांना पत्राद्वारे कळवून तातडीने उस्मानाबाद कार्यालयाकडून उलट तपासणी करून मोजमाप पुस्तीका हस्तगत करून विभागीय कार्यालयात पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या.
४दरम्यान अनेक कामांची मंजूरी एक असताना दोन ते तीन पटीचे वाढीव कामे दाखविण्यात आले असल्याचाही प्रकार उघडकीस आलेला आहे. यावर आता पुढे काय कारवाई होते. याबाबत चर्चा सुरू आहे.