शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:24 IST

आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव केला. या निकालावर संशय व्यक्त करीत शिंदे यांनी व्हीव्ही पॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

शहरातील पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालावर शिंदे यांनी शंका व्यक्त करीत निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार संजय शिरसाट यांना मिळालेली मतांविषयी शंका उपस्थित केल्या. आपल्याला विजयी उमेदवारापेक्षा अधिक मतदान मिळणे अपेक्षित होते. यामुळे मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाच्या वेळी तयार झालेल्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यांच्या या मागणीची निवडणूक विभाग दखल घेते अथवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतांच्या आकडेवारीवर विश्वास नाहीपश्चिम मतदारसंघात आपल्याला मतदारांनी भरभरून मतदान केले होते. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेरील आपल्या पक्षाच्या मंडपातच अधिक मतदार दिसत होते. तेव्हा साहजिकच आपल्याला अधिक मते मिळणे अपेक्षित होते. असे असताना मतमोजणीत आपल्याला १ लाख ६ हजार १४७ मते मिळतात तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला १ लाख २२ हजार ४९८ मते मिळतात, यावर आपला विश्वास नाही. यामुळे आपण व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.- राजू शिंदे, पराभूत उमेदवार

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSanjay Shirsatसंजय शिरसाट