कापूस उत्पादन निम्म्याने घटले!
By Admin | Updated: November 21, 2014 00:48 IST2014-11-21T00:29:42+5:302014-11-21T00:48:34+5:30
बीड : कापूस उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या बीडमध्ये यंदा लागवड क्षेत्रही वत्तढले होते; परंतु अत्यल्प पावसाने वाढ खुटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पदानावर झाला आहे़

कापूस उत्पादन निम्म्याने घटले!
बीड : कापूस उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या बीडमध्ये यंदा लागवड क्षेत्रही वत्तढले होते; परंतु अत्यल्प पावसाने वाढ खुटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पदानावर झाला आहे़ गतवर्षी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईची निर्मिती झाली होती़ यंदा उत्पादन निम्म्याने घटले असून शेतकऱ्यांचा घोर वाढला आहे़
गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती़ यंदा क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले़ एका हेक्टरमध्ये गतवर्षी सरासरी २७५ किलो रुईचे उत्पादन मिळाले होेते़ गतवर्षी सरासरी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईचे उत्पादन झाले होते़ यंदा ५ लाख टन दत्पादन घेणेही कठीण होऊन बसले आहे़ मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी होते;परंतु यंदा अशी अजिबातच स्थिती नाही़ दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापसाचा झाडा होऊ लागला आहे़
उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी कापसाला ५ हजारापर्यंत भाव मिळाला होता़ यंदा चार हजार भाव आहे़ खत, औषधी व इतर उत्पादन खर्च गृहित धरला तर कापसाला दिला जाणारा भाव न परवडणाराच आहे़ दुष्काळीस्थितीने उत्पादन तर घटलेच आहे;पण भावातही कापसाने मार खाल्ला आहे़ त्यामुळे कापूस पिकाला दुहेरी दणका बसला आहे़ दरम्यान, विहिरी, बोअरमध्ये पाणी शिल्लक असेल तर पिकांना सोडावे़ त्यामुळे शेवटच्या टप्प्यात थोडा फायदा होऊ शकतो असे जि़प़ चे कृषी विकास अधिकारी डी़ बी़ बिटके यांनी सांगितले़
गुणनियंत्रक रामेश्वर चांडक म्हणाले की, कापसासोबतच सोयाबीन, तूर या पिकांनाही फटका बसला़ अपुऱ्या पावसाने आधीच संकटात सापडलेले कापसाचे पीक नंतर किडींमुळे धोक्यात आले़ कीडनियंत्रणासाठी योग्य तो सल्ला शेतकऱ्यांना दिला गेला़ बहुतांश कापूस क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ त्यामुळे केवळ सिंचनाखालील कापूसच तग धरून आहे़