बाजार समितीत कापसाची आवक घटतेय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:57 IST2017-10-04T00:57:00+5:302017-10-04T00:57:00+5:30
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कापसाची आवक वाढण्याची शक्यता असून, पर्यायाने हमाल, मापाडींना रोजगार मिळणार आहे.

बाजार समितीत कापसाची आवक घटतेय !
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गत अकरा वर्षांपैकी पाच वर्षे कापसाची आवक पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक राहिलेली आहे. पण बहुतांश वेळा आवक निम्म्यापेक्षा अधिक घटल्याने हमाल, मापाडींच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र, यंदा कापसाची आवक वाढण्याची शक्यता असून, पर्यायाने हमाल, मापाडींना रोजगार मिळणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग ‘कॉटन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुहे याच भागात जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरींचे प्रमाण अधिक होते. तसेच शासनाच्या केंद्रांतही चांगली आवक होत असे. पण अनेक वेळा शेतकºयांना त्रास देणे, त्यांची आर्थिक अडवणूक करणे इ. प्रकार होत गेल्याने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आणणे टाळले. देऊळगाव राजा, सेलू, परतूर इ. बाजार समित्यांमध्ये कापूस विक्रीस प्राधान्य दिले गेले. परिणामी हमाल, मापाडींच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच जालना शहरातील बहुतांश कॉटन मिल बंद पडल्या. काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बैठक घेऊन हमाल व मापाडींना काम सुधारण्याचा व शेतकºयांशी नीट वागण्याचा इशारा दिला. यंदा कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कापसाची खरेदीही सुरु झाली आहे.