शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:42 IST

महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमनपा करणार संशोधन सुसज्ज मैदानाचे स्वप्न

औरंगाबाद : महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही. मागील नऊ महिन्यांपासून नारेगाव येथे कचरा टाकणे बंद आहे. मागील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन मनपाने खंडपीठाला यापूर्वीच दिले आहे. लाखो मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नारेगाव कचरा डेपोच्या जागेवर सुसज्ज मैदान उभारण्याचे स्वप्न मनपा प्रशासनाने बघितले आहे. सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी खाजगी संस्थेच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येईल. कचरा नष्ट करण्यासाठी निविदा काढण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे. नारेगाव येथे किमान २० ते २५ लाख मेट्रिक टन कचरा असावा, असा अंदाज आहे. यातील ६० टक्के कचऱ्याचे रूपांतर खत आणि मातीत झाले आहे. हा सर्व मिक्स पद्धतीचा कचरा असून, त्यात कॅरिबॅग, लोखंड, काच, ड्रेब्रीज वेस्टही आहे.

अनेक वर्षे हा कचरा असाच पडून राहिला तरी तो नष्ट होणार नाही. या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून जागेवरच कचरा नष्ट करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी मनपा प्रशासन करीत आहे. नारेगाव कचरा डेपोप्रश्नी खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या असताना महापालिका प्रशासनाने एक वर्षात संपूर्ण जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे.

या कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया करायची असल्यास मनपाकडे आर्थिक तरतूद अजिबात नाही. यापूर्वी राज्याने मनपाला ९० कोटींचा निधी दिला. या निधीतून कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामे सुरू आहेत. जुन्या कचऱ्यासाठी मनपाला परत एकदा राज्य शासनाकडेच निधीची मागणी करावी लागणार आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण