‘पुन्हा सही रे सही’ने उडवली धमाल

By Admin | Updated: September 17, 2014 01:15 IST2014-09-17T00:30:40+5:302014-09-17T01:15:00+5:30

औरंगाबाद : संपूर्ण नाट्यगृह सखींच्या गर्दीने खचाखच भरलेले... प्रत्येकाची नजर ‘भरत’ला शोधत होती... पडदा केव्हा उघडणार आणि ‘तो’ केव्हा दिसणार? याच एका प्रतीक्षेत सखी..

'Correct right' | ‘पुन्हा सही रे सही’ने उडवली धमाल

‘पुन्हा सही रे सही’ने उडवली धमाल

औरंगाबाद : संपूर्ण नाट्यगृह सखींच्या गर्दीने खचाखच भरलेले... प्रत्येकाची नजर ‘भरत’ला शोधत होती... पडदा केव्हा उघडणार आणि ‘तो’ केव्हा दिसणार? याच एका प्रतीक्षेत सखी... त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना पडदा उघडला आणि भरत जाधवच्या एन्ट्रीसोबतच ‘पुन्हा सही रे सही’ पाहताना सखींनी धमाल केली. सखींसाठी ही खास भेट असल्याने संत तुकाराम नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा जल्लोष अन् हास्यकल्लोळ झाला.
संत तुकाराम नाट्यगृह येथे आज लोकमत सखी मंच आयोजित ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा अंक रंगला. भरत जाधवच्या चौरंगी भूमिकेत नटलेले हे नाटक पाहताना सखींनी आनंद लुटला. यावेळी सखी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा आशू दर्डा, अध्यक्षा रेखा राठी, मनीषा सोनी, गीता अग्रवाल, बीना अग्रवाल, सरोज बगडिया, अरुणा काबरा, पद्मजा मांजरमकर, गीता अग्रवाल यांची उपस्थिती होती. आशू दर्डा यांच्या हस्ते मराठीतील सुपरस्टार भरत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
नाटकाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सखी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा आशू दर्डा म्हणाल्या, सखी मंचचा मला अतिशय गर्व वाटतो. घरून वेळेचे नियोजन करून सखी कार्यक्रमाला येतात. सखींसोबत असण्यानेही प्रचंड ऊर्जा मिळते.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकातील कथानक अत्यंत गमतीदार... चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मदन सुखात्मे यांच्या खुनाचा कट अनिकेत राजे (मदन सुखात्मे यांचे पीए) आणि दुसरी बायको मीरा ही करते. त्यांच्या मृत्यूनंतर वकील लेले मृत्युपत्र वाचण्यासाठी येतात. त्यानंतर सुखात्मेंच्या मृत्यूची बातमी कळताच अण्णा बेरके (सुखात्मेंचे काका), मनोरमा सुखात्मे व रूपा (पहिली बायको व मुलगी) हे वारसदार येतात. मदन सुखात्मे यांच्या मालमत्तेवर अधिकार गाजविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होतात. मात्र, अडचण होते ती अशी की, मदन सुखात्मे यांनी मृत्युपत्रावर सहीच केलेली नसते. मग नकली मदन सुखात्मे तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो.
कसदार अभिनयाने रंगमंच गाजविणारा अभिनेता भरत जाधवची अदाकारी पाहण्याची पुन्हा एकदा संधी सखींना मिळाली. ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा एकाहून एक सरस विनोदी चित्रपटांमधून मनोरंजनाचा खजिना त्यांनी खुला केला. त्यांच्यासोबतच जयराज नायर, मनोज टाकणे, मृणाल भुस्कुटे, सीमा लाड, गीतांजली कांबळी, प्रशांत विचारे, केदार शिर्सेकर या सर्व गुणी कलाकारांच्या दमदार अभिनयाने सखींना प्रचंड हसविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
रंगा, हरी आणि गलगले अशी तिन्ही रूपे मदन सुखात्मे म्हणून रंगमंचावर वावरतात. खरा मदन सुखात्मे कोण? या गोंधळात वेळ येते ती मृत्युपत्रावर सही करण्याची; पण ‘कालाय तस्मै नम:’ या पंक्तीप्रमाणे मदन सुखात्मे जिवंत असल्याचे निदर्शनास येते. तोच त्या मृत्युपत्रावर खरी सही करतो. त्याची सर्व संपत्ती ट्रस्टला देऊन टाकतो आणि पडदा पडतो. नाटकातील ‘पुन्हा सही, पुन्हा सही, पुन्हा सही, हवी, हवी सगळ्यांना पुन्हा सही’ यासारख्या इतर सुमधुर गाण्यांमुळे नाटकाची रंगत आणखी वाढली.

Web Title: 'Correct right'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.