शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी लावले मनपाचे दार

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी सोमवारी मनपात आंदोलन केले़ आयुक्तांच्या दालनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले़ त्यानंतर मनपाच्या समोरील बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले़ जवळपास २८ कोटी रुपये शिल्लक असल्याचा दावा करीत सत्ताधारी असलेल्या कांबळे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे़२०१२-१३ ते २०१४ या आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेली रक्कम शिल्लक असतानाही खर्च केली जात नाही, याला आयुक्त सुधाकर तेलंग जबाबदार असल्याचा आरोप कांबळे यांनी केला़ पायाभूत विकास, नगरोत्थान आदी योजनेमधील २८ कोटी ८४ लाख रूपये शिल्लक असतानाही किरकोळ कामांसाठी मनपाकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे़ प्रभागातील जलवाहिनीचा पाईट फुटला, व्हॉल्व लिकेज झाले तर नागरिकांची ओरड वाढते, त्यासाठी खिशातून पैसे घालण्याची वेळ आली असल्याचे लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले़ निधी खर्च होत नसल्यामुळे मी मनपाला कुलुप लावणार होते, परंतू बांधकाम सभापती गिरीष पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळे कुलूप लावले नाही़ मनपात कसल्याही प्रकारचे नियोजन नाही़ जवळपास एक तास काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, किशोर राजुरे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेना गटनेत्या सुनिता चाळक, राष्ट्रवादीचे राजा मणियार हे प्रवेशदारात बसले होते़ यावेळी चंद्रकात चिकटे म्हणाले, प्रशासन आणि महापौर यांच्यात ताळमेळ नाही़ २८ कोटी ८४ लाख रूपये खर्च न केल्याने पडून आहेत़ (प्रतिनिधी)