आयुक्तांना घेरणार काँग्रेसचे नगरसेवक
By Admin | Updated: October 30, 2014 00:29 IST2014-10-30T00:02:33+5:302014-10-30T00:29:43+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आयुक्त पी.एम. महाजन यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.

आयुक्तांना घेरणार काँग्रेसचे नगरसेवक
औरंगाबाद : महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक आयुक्त पी.एम. महाजन यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. ३ सप्टेंबरपासून आयुक्त पालिकेत रुजू झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी शहरातील पथदिवे, कचरा संकलन, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांकडे काहीही लक्ष दिलेले नाही. शिक्षण विभागाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत.
शिक्षकांच्या वेतनाच्या अडचणी आहेत. अधिकारी, विभागप्रमुख दालनात नसतात. अशा अनेक अडचणी असताना आयुक्त पदाधिकाऱ्यांची भेट घेत नसल्याचा आरोप गटनेते मीर हिदायत अली यांनी केला. आयुक्तांना भेटीसाठी पत्र दिले आहे. त्यानंतरही त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आयुक्तांना घेराव घालण्याची मानसिकता झाल्याचे ते म्हणाले.