नगरसेवकाला बारामतीत बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:22 IST2017-09-25T00:22:34+5:302017-09-25T00:22:34+5:30
म्हाळस जवळा येथील नारायण उर्फ वैभव राऊत यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक संतोष गायकवाड याला पिंपळनेर पोलिसांनी रविवारी बारामतीत बेड्या ठोकल्या.

नगरसेवकाला बारामतीत बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील म्हाळस जवळा येथील नारायण उर्फ वैभव राऊत यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक संतोष गायकवाड याला पिंपळनेर पोलिसांनी रविवारी बारामतीत बेड्या ठोकल्या. वैभव यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन व त्यांच्या पत्नी तसेच भावाच्या जवाबावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.