मनपा एक हजार बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:41+5:302021-04-08T04:05:41+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तब्बल एक हजार बेड ऑक्सिजनचे निर्माण ...

मनपा एक हजार बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करणार
औरंगाबाद : कोरोनाच्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तब्बल एक हजार बेड ऑक्सिजनचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण कामासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
चिकलठाणा एमआयडीसी भागातील मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये सध्या १२० बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था आहे. या ठिकाणी संपूर्ण तीनशे बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय एमआयटी येथे महापालिकेच्या सीसीसी सेंटरवर तीनशे बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येईल. सिपेट येथे अडीशे, तर देवगिरी महाविद्यालयातील वसतिगृहात दीडशे खाटांवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. जंबो सिलिंडरचा वापर करून प्रत्येक बेडवर ऑक्सिजन पाईप लावण्यात येईल. साधारणपणे या कामासाठी किमान एक महिना लागणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
चौकट..
तपासणी आणि रुग्णालयात उशिरा येण्याचे प्रमाण
ताप किंवा इतर लक्षणे आढळून आल्यानंतर असंख्य नागरिक घरीच औषधोपचार करीत आहेत. किंचित प्रकृती ढासळली तर नागरिक तपासणी करीत आहेत. लवकरात लवकर रुग्णालयात दाखलसुद्धा होत नाहीत. तेव्हापर्यंत बराच उशीर झालेला असतो. संबंधित रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी आधी लस घ्यावी, त्यामुळे व्हायरसचे शरीरावर साैम्य प्रहार होतील. वेळेवर तपासणी आणि उपचार खूप गरजेचे असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले.