शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

खाजगी हॉस्पिटल्सवर निगराणीसाठी मनपाचा अधिकारी नेमा : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:24 IST

अवाजवी रक्कम आकारली जात असेल तर हॉस्पिटलची आयकर खात्याकडे तक्रार द्यावी आणि गुन्हा दाखल करण्याची सूचना

ठळक मुद्देऔषधी कमी पडत असेल तर तातडीने खरेदी करासुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचारी तातडीने भराहोम क्वारंटाईन करणे बंद करा

औरंगाबाद : खाजगी हॉस्पिटल्सकडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जास्तीची रक्कम आकारली जात असेल तर त्याबाबत परीक्षण करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी नेमावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना दिले.  रुग्णांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असेल तर हॉस्पिटलची आयकर खात्याकडे तक्रार द्यावी आणि गुन्हा दाखल करण्याचे देखील त्यांनी सूचित केले. 

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजोय मेहता आणि संजयकुमार, डॉ. प्रशांत जोशी होते. या कॉन्फरन्सला पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते.

कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. ते म्हणाले, औषधीचा तुटवडा असेल तर तातडीने पुरवठा केला जाईल. स्वॅब तपासणी वाढवा, टेस्टिंगसाठी लागणारी औषधी पुरविली जाईल. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचारी तातडीने भरा, होम क्वारंटाईन करणे बंद करा, शोधमोहीम वेगाने राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोनावर नियंत्रण मिळालेच पाहिजे, यासाठी कुणाचीही सबब ऐकली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

औषधी कमी पडत असेल तर तातडीने खरेदी करालॉकडाऊनचे अधिकार स्थानिक पातळीवर : लॉकडाऊन करायचे असेल तर त्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त याबाबत एकत्रित निर्णय घेऊ शकतात; परंतु लॉकडाऊन कडक पाळले जाणार असेल तरच निर्णय व्हावा, अन्यथा नावालाच लॉकडाऊन करायचा निर्णय होऊ नये, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे आ. शिरसाट यांनी सांगितले.

आयुक्त हटावची तलवार म्यान मनपा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांना हटविण्यात यावे किंवा त्यांच्या मदतीसाठी उच्चाधिकार असलेले अधिकारी नेमावेत, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीतून बुधवारी पुढे आली होती; परंतु मुख्यमंत्र्यांसमोर बोलताना या मागणीवर काहीही चर्चा झाली नाही. दरम्यान, आ. शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले, अधिकारी हटावबाबत काहीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांशी कॉन्फरन्स करण्यापूर्वी  पालकमंत्र्याशी होणारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट झालीच नाही, त्यामुळे आयुक्त हटाव प्रकरणाची तलवार म्यान झाल्याचे दिसत आहे.

विभागीय आयुक्तांच्या सूचना कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रशासकीय यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही, यासंदर्भात बुधवारी दोन खासदार आणि पाच आमदारांनी एकत्रित बैठक घेऊन विभागीय आयुक्तांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार  आयुक्त केंद्रेकर यांनी गुरुवारी लोकप्रतिनिधींची बैठक घेत सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. यासंदर्भात केंद्रेकर म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेतली आहे. दर सोमवारी आयुक्तालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक होईल. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणे, सात दिवसांनंतर स्वॅब घेणे, मनपाच्या कामाबाबत सुधारणा, यासंदर्भात त्यांच्या सूचना होत्या. याबाबत कारवाई करण्याचे बैठकीत ठरले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद