शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus : पुढचे सात दिवस महत्त्वाचे; अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:48 IST

महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचे आवाहन

ठळक मुद्देसर्व आठवडी बाजार राहणार बंदशासकीय आणि मनपाची यंत्रणा सज्ज

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज असून, शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, छावणी टोलनाका या चार ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर सुरू केले आहेत. शहरातील सर्व आठवडी बाजार बंद केले जाणार आहेत. पुढील ७ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

शहरावर घोंगावणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा १०० टक्के सज्ज आहे. नागरिकांनी अजिबात घाबरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. धूत, एमजीएम, हेडगेवार, सिग्मा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून, क्वॉरंटाईन वॉर्डदेखील तयार ठेवले जाणार आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स, सभागृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. औरंगाबाद व्यापारी महासंघ, कपडा असोसिएशन, आयएमए यांच्याकडून मनपाला मदत करण्यात येत आहे. 

आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, शहरात चार ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू आहेत. शहरात खासगी ट्रव्हल्सने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग होणार आहे. विमानतळावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग केले जात आहे. या स्क्रिनिंग सेंटरमध्ये तीन शिफ्टमध्ये १२ कर्मचारी राहणार असून, २४ तास हे सेंटर सुरू राहणार आहे. 

वॉर्ड कार्यालयांना १ लाख रुपयेवॉर्ड कार्यालयांना सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी १ लाख रुपये खर्चाची परवानगी दिली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. 

डीपीसीतून १ कोटी येणारकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला जिल्हा नियोजन समिती व एसडीआरएफमधून प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून औषधी, उपकरणे व साहित्य खरेदी केले जाईल.

मनपाकडून ४ कोटी १७ लाखांची मागणी महापालिकेने आरोग्य विभागासाठी आवश्यक लागणाऱ्या साहित्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ४ कोटी १७ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. 

क्वॉरंटाईन, आयसोलेटेड वॉर्डची व्यवस्थाएखादा रुग्ण आढळून आल्यास त्यास तातडीने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाईल. कोरोनाच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ५० बेड आयसोलेटेड तर ५० बेड क्वॉरंटाईन, घाटी रुग्णालयात १०० बेड क्वॉरंटाईन तर ५० बेड आयसोलेटेड, महापालिका ५० क्वॉरंटाईन आणि ३० आयसोलेटेड बेडची व्यवस्था करणार आहे.

मनपात येण्याची गरज नाहीनागरिकांनी मनपामध्ये न येता घरबसल्या तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्तांच्या कंट्रोल रूमच्या नंबरवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे किंवा व्हिडिओ कॉल करून तक्रार नोंदविता येईल. ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्र पाठवून तक्रार करू शकतात. आपल्या तक्रारींची ७ दिवसांत दखल घेऊन तक्रार सोडविली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका