coronavirus : स्वॅब देण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबातील २० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 07:08 PM2020-07-07T19:08:14+5:302020-07-07T19:10:19+5:30

पोलिसांना पाचारण करून स्वॅब घेतले असता, तब्बल २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

coronavirus: Initially, 20 members of the family who opposed the swab test were positive | coronavirus : स्वॅब देण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबातील २० जण पॉझिटिव्ह

coronavirus : स्वॅब देण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबातील २० जण पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देपदमपुरा भागात नव्याने कोरोनाची साथ पसरली आहेकाही दिवसांपूर्वी या भागातील कोरोनाची साखळी तुटली होती

औरंगाबाद : शहरातील पदमपुरा भागात नव्याने कोरोनाची साथ पसरली असून, एकाच कुटुंबातील तब्बल २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील  नागरिकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील नागरिकांनी सुरुवातीला स्वॅब देण्यास प्रचंड विरोध केला. पोलिसांना पाचारण करून स्वॅब घेतले असता, तब्बल २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

पदमपुरा भागात दोन महिन्यांपूर्वी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन-चार रुग्ण अधून-मधून आढळून आले. काही दिवसांपूर्वी या भागातील कोरोनाची साखळी तुटली होती. मात्र, चार दिवसांपूर्वी कमान भागातील एक ८० वर्षीय वृद्ध महिला कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात आले. 

या चारही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एका मोठ्या वाड्यात राहणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील इतरांचे स्वॅब घेण्यासाठी महापालिकेचे पथक पोहोचताच सदस्यांनी मात्र विरोध केला. शेवटी पोलिसांना पाचारण करून स्वॅब घेण्यात आले असता, तब्बल १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच वाड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० पर्यंत पोहोचली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पदमपुरा भागाची वाटचाल आता कोरोना हबकडे होताना दिसून येत आहे. या भागात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास नवीन कंटेन्मेंट झोन तयार होईल.

आता चाळीस नागरिकांच्या लाळेचे नमुने घेतले
या कुटुंबातील अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होता. त्यांनी गल्लीतील डॉक्टरकडून उपचार घेतले. मात्र, वृद्ध महिलेला त्रास सुरू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचे समोर आले व घरातील तब्बल २० जण नंतर पॉझिटिव्ह निघाले. महापालिकेच्या पथकाने सोमवारी याच वाड्यात राहणाऱ्या इतर कुटुंबांतील व परिसरातील ४० जणांचे स्वॅब घेतले आहेत.

Web Title: coronavirus: Initially, 20 members of the family who opposed the swab test were positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.