शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

coronavirus : परदेशातून आलेल्यांनी स्वतःहून माहिती द्यावी, अन्यथा गुन्हे नोंदवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 1:20 PM

परदेशवारी केल्याची माहिती शेजाऱ्यांनी जरी दिली तरी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती. 

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सर्व सीमांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार तपासणीशहर व जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले

औरंगाबाद : दोन महिन्यांपासून आजवर ज्यांनी परदेशवारी केली आहे, त्यांनी स्वत:हून माहिती देऊन तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर नागरी सुरक्षेला बाधा पोहोचविल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात येतील. परदेशवारी केल्याची माहिती शेजाऱ्यांनी जरी दिली तरी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती. 

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिडको बसस्थानक, नगरनाका येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली जात आहे. आगामी दोन दिवसांत जिल्ह्याला इतर जिल्ह्यांतून जोडणाऱ्या सर्व सीमांवर स्क्रीनिंग केली जाईल. तसेच शहर व जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे चौधरी म्हणाले. 

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सर्व शासकीय, प्रादेशिक कार्यालयांसाठी परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयात येऊ नये. ई-मेल, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे तक्रारी व इतर कागदपत्रे नागरिकांना दाखल करता येतील. इपिडेमिक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिकांनी ये-जा करण्यासाठी शक्यतो एकच रस्ता वापरावा. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कक्ष स्थापन करावा. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के कार्यालये बंद नसतील. रोटेशनप्रमाणे कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल प्रशासनाला सदरील निर्णय लागू नाही. ज्यांनी रजेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना १०० टक्के रजा देण्यात येईल. नागरिकांनी गर्दी करू नये, विनाकारण प्रवास टाळावा, गर्दीत जाणेही टाळावे, कुटुंबाचा विचार करावा, असे आवाहन चौधरी यांनी केले. 

...तर पोलीस बळाचा वापर करणार जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला तर गुन्हे दाखल करावे लागतील. वेळप्रसंगी पोलीस बळाचादेखील वापर करावा लागेल. येत्या दोन दिवसांत प्रशासनाच्या आवाहनास दाद दिली नाहीतर जमावबंदी आदेश १०० टक्के अमलात आणला जाईल. आजवर गुन्हे दाखल केले नाहीत, परंतु यापुढे गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू. ४या सर्व प्रक्रियेतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. येणारे १० दिवस काळजीचे आहेत. बाजारपेठा रोटेशनप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय लवकरच होईल. १०० टक्के बाजारपेठा बंद ठेवणे हा पर्याय नाही. शहर अजून दुसऱ्या टप्प्यात गेले नाही. परंतु नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन चौधरी यांनी केले.

हॉटेल्स, पानटपऱ्यांबाबतही होणार निर्णयहॉटेल्समध्ये गर्दीचे प्रमाण वाढते आहे. वर्क फ्रॉम होममुळे रात्रीच्या वेळी गर्दी दिसते आहे. तसेच पानटपऱ्यांवरही गर्दी दिसते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेथे गर्दी होते, ती ठिकाणे बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. हॉटेल्सबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच पानटपऱ्यांबाबतही निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटन