शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus : शहरात मॉलिक्युलर लॅब असती तर टळली असती धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 19:17 IST

साथरोगांच्या परिस्थितीत आता रुग्णांना रक्त, लाळ नमुने तपासणीसाठी मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते आहे. 

ठळक मुद्दे उद्धव ठाकरे यांचे १० वर्षांपूर्वीचे आदेश नेत्यांच्या दूरदृष्टीला महापालिकेकडून हरताळ

- विकास राऊत  

औरंगाबाद : शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात ‘मॉलिक्युलर लॅब’ उभारण्याचे वचन २०१० साली मनपा निवडणुकीदरम्यान औरंगाबादकरांना दिले होते. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी लॅब (प्रयोगशाळा) ऐवजी डायग्नोस्टिक सेंटर उभारले. नेत्यांच्या दूरदृष्टीला स्थानिक सत्ताधाऱ्यांनी हरताळ फासल्याने साथरोगांच्या परिस्थितीत आता रुग्णांना रक्त, लाळ नमुने तपासणीसाठी मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते आहे. 

शहर व परिसरातील १४ कोरोना संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. मागील १० वर्षांत मॉलिक्युलर लॅब मनपा सत्ताधाऱ्यांनी उभारली असती तर कोरोना व्हायरससह डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या अनुषंगाने होणाऱ्या चाचण्या औरंगाबादेत झाल्या असत्या.  मनपाने रेल्वेस्टेशन रोडवर जे डायग्नोस्टिक सेंटर उभारले. त्यामध्ये फक्त एक्स-रे, सिटी स्कॅनची व्यवस्था आहे. साथरोगांच्या विविध तपासण्या तेथे होत नाहीत. 

काय म्हणाले होते ठाकरे...६ आॅक्टोबर २०१० रोजी उद्धव ठाकरे म्हणाले होते, शहरातील नागरिकांना साथरोगांच्या तपासणीसाठी मुंबई, पुण्याला जाण्याची गरज पडू नये. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया या साथरोगांचे निदान व्हावे, यासाठी मॉलिक्युलर लॅब मनपाने उभारावी. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, पण यासाठी जास्त रक्कम लागणार नाही. मॉलिक्युलर लॅबमुळे साथरोगग्रस्त रुग्णांच्या रक्त व इतर तपासणीसाठी लागणारी यंत्रणा येथेच उपलब्ध होईल. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या लॅबचा फायदा होईल. मुंबई, पुणे, नागपूर येथून अहवाल येईपर्यंत रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकतो. लॅबसह समांतर जलवाहिनी, शहराला रोज पाणीपुरवठा करणे, स्वच्छ भाजीमंडई बांधणे, गुंठेवारीतील घरे नियमित करणे, सार्वजनिक शौचालये बांधणे आदी उपक्रम राबविण्याचे आदेश त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले होते. 

कोण होते त्यावेळेस महापौर...अनिता घोडेले तेव्हा महापौर होत्या. मॉलिक्युलर लॅब भविष्यात सुरू करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्यानंतर कला ओझा, त्र्यंबक तुपे, भगवान घडमोडे हे महापौर झाले. विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांचाही कार्यकाळ २९ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे. या १० वर्षांत एकाही महापौराने अशी प्रयोगशाळा असावी, याकडे लक्ष दिले नाही. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या