शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शासकीय रुग्णालयांवर कोट्यवधी खर्च; पण रुग्णांचा ‘खाजगी’कडेच ओढा अधिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:56 IST

नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्देसरकारी रुग्णालयातील खाटा रिक्त रुग्णांचा ओढा खाजगीकडे अधिक

औरंगाबाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने कोट्यवधी रुपये खर्च करून उपचारासाठी आवश्यक सुविधा उभारली. याठिकाणी रुग्णांवर उपचारही मोफत होत आहेत. तरीही सरकारी रुग्णालयांतील खाटा रिक्त आणि खाजगी रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या, अशी परिस्थती आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

औरंगाबादेत गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचा विळखा पडलेला आहे. सरकारी यंत्रणेबरोबर खाजगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. रोज दोनशे ते तीनशेच्या घरांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेट कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. खाजगी रुग्णालये आणि खाजगी जागेतही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असो की चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील युद्धपातळीवर अवघ्या एक महिन्यात उभारण्यात आलेले मेट्रॉन रुग्णालय, अशा सर्वच ठिकाणी उपचाराच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.

डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी नेमण्यात आले. तरीही या शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयांकडे रुग्णांचा अधिक कल असल्याचे खाटांच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. कारण सरकारी रुग्णालयांत खाटा रिकाम्या आणि खाजगी रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी फुल झालेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थती का आहे, रुग्ण शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याचे का टाळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विमा, उपचाराची गुणवत्ता, सोयीसुविधांची परिस्थिती जाणून रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांची निवड करीत असल्याचे दिसते.  रुग्णांचा खाजगी रुग्णालयांवर अधिक भरवसा असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांतील रिक्त खाटांवरून पाहायला मिळत आहे. 

उपचारासाठी दाखल झाल्यानंतर बदलतो निर्णयघाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात; परंतु येथे दाखल झाल्यानंतरही अनेक जण खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरत असल्याची परिस्थती आहे. मनपाकडून रुग्णांची अँटिजन तपासणी केली जाते. यात अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करते; परंतु अवघ्या एक ते दोन दिवसांत रुग्ण अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करतात, अथवा खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देत असल्याचेही दिसून येत आहे.

कोणालाही माघारी पाठवीत नाहीकोणत्याही रुग्णालयाला घाटीतून माघारी पाठविले जात नाही. काही वेळा व्हेंटिलेटर उपलब्ध नसेल तरच रुग्ण खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देतो.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

सरकारी यंत्रणा सक्षमकोरोनाच्या उपचारासाठी सरकारी यंत्रणा सक्षम आहे. हा आजार सध्या उच्च स्तरातील वर्गात अधिक              आढळत आहे, तसेच आपल्याला कोरोना झाला हे कोणाला समजू नये, ही दोन कारणे खाजगी रुग्णालयात जाण्यामागे असू शकतात.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील खाटांची परिस्थितीजिल्ह्यात ८० कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी १ हजार २७६ खाटा आहेत. जिल्ह्यात एकूण २९ डीसीएचसी असून, त्यांची १ हजार ८२९ खाटांची क्षमता आहे, तर ३ डीसीएच आहेत. याठिकाणी ७५६ खाटा आहेत. शासनाने या सगळ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला.

रुग्णालय    एकूण खाटा    दाखल रुग्ण   रिक्त खाटाघाटी     ४५८          ३४५     ११३जिल्हा रुग्णालय     २००          १८१     १९ईएसआयसी रुग्णालय     ६५          ५५         १०मेट्रॉन      २३५          २३५     ०एमजीएम हॉस्पिटल     २७४          २२१     ५३धूत हॉस्पिटल     ७५          ७३         २बजाज हॉस्पिटल      ३४          २९         ५डॉ. हेडगेवार हॉस्पिटल     ५८          ५८         ०    एशियन हॉस्टिल       ४०          ३७         ३ओरियन सिटी केअर हॉस्पिटल    ३२         ३२         ०वायएसके हॉस्पिटल     ५०          २५          २५अजंता हॉस्पिटल     २५          १३          १२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद