शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

coronavirus : गरोदर महिलांना घाटी रुग्णालय ठरतेय वरदान; ४४ दिवसांत २३६६ प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:43 PM

गरोदरपणाच्या कालावधीत खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही समोर आली आहे. 

ठळक मुद्देकंटेन्मेंट झोनमधील महिलांना मिळतोय मोठा आधार

- राम शिनगारे  

औरंगाबाद : कोरोनाने थैमान घातल्यामुळे खाजगी आरोग्य सेवाही कोलमडली आहे. अनेक ठिकाणी उपचार करण्यास नकार देण्यात येत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) प्रसूती विभाग गरोदर महिलांना वरदान ठरतो आहे. शहरात १ एप्रिल ते २४ मे या ४४ दिवसांच्या कालावधीमध्ये घाटीत तब्बल २३६६ महिलांची प्रसूती झाली आहे. यात गरोदरपणाच्या कालावधीत खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही समोर आली आहे. 

कोरोनामुळे औरंगाबाद शहर रेड झोनमध्ये आहे. या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी राज्यातील खाजगी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार आवाहन करीत आहेत, तरीही अनेक ठिकाणी खाजगी दवाखान्यात कोरोनाशिवाय इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे या  रग्णांना नाईलाजाने का होईना आता शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयात कोरोनाबांधितांवर उपचार करण्यात येत असतानाच इतरही रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. खाजगी दवाखान्यात गरोदर महिलांच्या प्रसूतीसंदर्भात अनेकांना विविध अनुभव येतात. यात खर्चही मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रसूती होऊ न देता सिझेरियन केले जाते. मात्र, घाटीतील प्रसूती विभाग नैसर्गिक प्रसूतीवर अधिक भर देतो. आवश्यकता असेल तरच सिझेरियन केले जाते. 

शहरात १ एप्रिलपासून कोरोनाचे संकट अधिक गडद होत गेले आहे. सध्या शहरात १३०० पेक्षा अधिक कोरोनाबधित आहेत. त्याचवेळी घाटीतील प्रसूती विभागातही १ ते ३० एप्रिलपर्यंत तब्बल  १५६२ गरोदर महिलांची प्रसूती झाली आहे. यात नैसर्गिक प्रसूतींची संख्या १२१५, तर सिझेरियनची संख्या ३४७ एवढी आहे, तर १ ते २४ मे दरम्यान ८०४ प्रसूती झाल्या आहेत. यात ५६१ नैसर्गिक आणि सिझेरियनची संख्या २४३ एवढी आहे. कोरोनाच्या एकूण ४४ दिवसांमध्ये तब्बल २३६६ प्रसूती झाल्याची माहिती घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली. 

कोरोनाबाधित गरोदर माता अन् बाळ सुखरूप घाटीतील प्रसूती विभागात पहिली कोरोनाबाधित गरोदर महिला ३ मे रोजी दाखल  झाली होती. या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत एकूण १९ कोरोनाबाधित गरोदर महिला घाटीत दाखल झाल्या होत्या. यातील ४ गरोदर महिलांची प्रसूती झालेली नाही. त्यांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६ महिलांना डिलिव्हरीनंतर कोरोनामुक्त झाल्यावर सुटी देण्यात आली. ९ महिलांवर उपचार सुरू आहेत. 

हे डॉक्टर घेताहेत कठोर परिश्रम कोरोनाच्या संकटात गरोदर महिलांवर उपचार आणि प्रसूती करण्यासाठी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा  यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यात युनिट एकमध्ये डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. अंकिता शाह, निवासी डॉक्टर शंतनू पाटील, डॉ. नेहा लोहिया, डॉ. सुश्मिता पवार, डॉ. श्रुतिका माकडे, युनिट दोन मध्ये डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. राहुल इंगळे, डॉ. मेघा गोसाई, डॉ. स्वाती बडगिरे, डॉ. मोहिनी पाटील,  डॉ. निशा झा,  डॉ. संजय पगारे, युनिट तीनमध्ये डॉ. विजय कल्याणकर, डॉ. मेघा चव्हाण, डॉ. रेवती घायाळ, डॉ. शिवांगी वर्मा आणि युनिट चारमध्ये डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. कनिगा फातिमा, डॉ. सुनील पंडागळे, डॉ. पूजा मोर्या यांचा समावेश आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला