शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

CoronaVirus : रुग्णसंख्येत होतेय घट; कोरोनाला हरविण्याकडे औरंगाबादची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:42 PM

CoronaVirus: गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला.

ठळक मुद्देशहरात रुग्ण कमी होत असताना ग्रामीण भागांत रुग्णसंख्येचा चढता क्रम कायमब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्तीचा फायदा

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन महिने कोरोनाच्या हाहाकारानंतर आता शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. रोज निदान होणाऱ्या शहरातील रुग्णसंख्येत घट होत असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी केवळ ३० टक्के रूग्ण शहरातील आहेत. तर तब्बल ७० टक्के रूग्ण ग्रामीण भागातील आहे. कोरोनाला हरविण्याकडे शहराची वाटचाल सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात रुग्णांची अद्यापही संख्या वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाने अक्षरश: कहर केला. अवघ्या काही दिवसांत ५० हजारांवर रुग्णांची भर पडली. रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी भरून गेल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला. जिल्ह्यात ५ मे रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार ४४४ होती. यात शहरातील रुग्णांची संख्या फक्त २ हजार ७८५ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ हजार ६५९ आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात राेज अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तर शहरात रुग्ण कमी होत असल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडणे आदींमुळे शहरात कोरोना आटोक्यात येत असल्याची स्थिती आहे.

३६ दिवसांत १० हजारांवरून २ हजारांवर३१ मार्च रोजी शहरात १० हजार ९१५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी २ हजार ७८५ झाली. त्या उलट ग्रामीण भागात ३१ मार्च रोजी ४ हजार ६५५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी ६ हजार ६५९ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

ब्रेक द चेन, लसीकरण, स्वयंशिस्तीचा फायदाब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. परंतु आपल्याला गाफील राहता येणार नाही. धोका अजूनही आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी आरोग्य सुविधेत सुधारणा, आणखी वैद्यकीय सुविधेच्या इमारती, नागरिकांत त्रिसूत्रीबद्दल आणखी जागरूकता आणि स्वयंशिस्त, तसेच लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमुळे पुढील लाटेत औरंगाबाद शहर, नागरिक सुरक्षित राहतील.-आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त

शहराचा रिकव्हरी रेट-९४.५२ टक्केशहरात असा घसरला आलेखतारीख नवे रुग्ण- उपचार घेणारे रुग्ण२६ एप्रिल- ४९७ -४९४८२७ एप्रिल- ५९४             - ४७८३२८ एप्रिल- ५३०             - ४७०५२९ एप्रिल- ४५६ - ४४४९३० एप्रिल- ४२९             -४३०९१ मे- ४८२             - ४१७१२ मे- ३७३             - ४०१८३ मे- ३२०             - ३६३२४ मे- ३७४             - ३१४६५ मे- ३८१             - २७८५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद