शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

Coronavirus In Aurangabad : बजाजनगरच्या धर्तीवर जिल्ह्यात ९७ हॉटस्पॉटमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:37 IST

बजाजनगरमध्ये आरोग्य विभागाकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३९६ शिक्षकांची १९६ पथके तैनात करून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देबजाजनगर परिसरात १८ जुलैपर्यंत सर्वेक्षण ग्रामीण भागात २५ जुलैपर्यंत होणार सर्वेक्षण

औरंगाबाद : जि.प.च्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर परिसरातील सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेतच नियंत्रणात येऊ शकला. बजाजनगरचा हाच पॅटर्न जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सुमारे ९७ हॉटस्पॉटच्या ठिकाणी वापरून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 

यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, वाळूज-बजाजनगर या औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. मात्र, तो नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३९६ शिक्षकांची १९६ पथके तैनात करून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. या पथकांमध्ये आरोग्य कर्मचारीही तैनात आहेत. ही पथके बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, वडगाव कोल्हाटी, वळदगाव या जवळपास सहा लाख लोकसंख्येच्या परिसरात ३० जूनपासून प्रत्यक्ष ‘डोअर टू डोअर’ जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. 

घरात कोणाला सर्दी, ताप, खोकला, घशात खवखवणे याची माहिती जाणून घेत आॅक्सिमीटरद्वारे कुटुंबातील ५० वर्षांवरील नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी, नाडीचे ठोके तपासले जात आहेत. या माध्यमातून सुरुवातीला प्राथमिक लक्षणे असलेले ७०-७० संशयित रुग्ण आढळून आले. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आले. आता अशा प्रकारचे रुग्ण आढळून येण्याची संख्या ७ पर्यंत खाली आली आहे. वेळीच संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी उदय चौधरी व सीईओ डॉ. गोंदवले यांनी बजाजनगरचा हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असून, शंभर कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. 

बजाजनगर परिसरात १८ जुलैपर्यंत सर्वेक्षणशिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी सांगितले की, बजाजनगर व लगतच्या औद्योगिक परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत शिक्षकांच्या माध्यमातून १८ जुलैपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. जिल्ह्यातील ९७ ‘हॉटस्पॉट’मध्ये हे काम २५ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या या पद्धतीमध्ये पथकांच्या नियंत्रणासाठी माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख हे सुपरवायझर म्हणून, तर दहा सुपरवायझरच्या नियंत्रणासाठी एक शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे या सर्वेक्षणावर नियंत्रण करतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद