Coronavirus : परभणीत २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ३२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:24 IST2020-08-01T10:21:17+5:302020-08-01T10:24:38+5:30

परभणी आणि मानवत येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus: 2 coronavirus patients deaths in Parbhani; Corona death toll rises to 32 | Coronavirus : परभणीत २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ३२ वर

Coronavirus : परभणीत २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या ३२ वर

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या ६३२ आहे.

परभणी : शहरात उपचार घेत असलेल्या २ कोरोनाबधित व्यक्तींचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये परभणी व मानवत येथील व्यक्तींचा समावेश आहे. 

परभणी शहरातील देशमुख गल्ली भागातील ३५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मृत्यू झाला.

अन्य एक घटनेत मानवत शहरातील एका ५७ वर्षीय व्यक्तीस २९ जुलै रोजी परभणी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा शनिवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या ६३२ आहे.

Web Title: Coronavirus: 2 coronavirus patients deaths in Parbhani; Corona death toll rises to 32