coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०१ रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:28 AM2020-07-23T09:28:27+5:302020-07-23T09:31:24+5:30

रुग्णालयात भरती बाधितांची संख्या ५ हजार पार

coronavirus: 101 patients found in Aurangabad district, three die | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०१ रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०१ रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले४१७ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०१ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रुग्णालयातील भरती बधितांची संख्या पाच हजार पार गेली आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आतापर्यंत १२ हजार १२६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६६९० बरे झाले, ४१७ जणांचा मृत्यू झाला. तर ५०१९ जणांवर उपचार सुरु आहेत. आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील ४ कोरोनाबाधितांचा समावेश शहरातील ८० तर ग्रामीण भागातील १७ बाधीत रुग्ण आहेत.

तीन बाधितांचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील ७० वर्षीय महिला आणि ८०  वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील ८० रुग्ण

विठ्ठल नगर २, गांधी नगर १०, दलालवाडी २, राम नगर ६, सावित्री नगर, हर्सुल ६, कुंभार गल्ली, हर्सुल १, पडेगाव ४, स्वामी विवेकानंद नगर ३, कैसर कॉलनी २, टाइम्स कॉलनी १, अविष्कार कॉलनी, एन सहा १, पुंडलिक नगर १, छावणी १, पद्मपुरा १, क्रांती नगर १, बन्सीलाल नगर ४, बनेवाडी ३, छावणी १, मयूर पार्क १, उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी ५, गुलमोहर कॉलनी, एन पाच २, विश्व भारती कॉलनी २, हनुमान नगर, गल्ली नं. पाच १, विष्णू नगर १, ठाकरे नगर, एन दोन सिडको २, एन दोन, जिजामाता कॉलनी १, बालाजी नगर २, एसआरपीएफ परिसर १, हिमायत बाग परिसर २, जवाहर कॉलनी १, सिल्क मिल कॉलनी १, गणेश नगर १, एसबी मुलांचे वसतिगृह परिसर १, दर्गा रोड परिसर १, देवगिरी नगर, सिडको २, अन्य २

ग्रामीण भागातील १७ रुग्ण
कन्नड १, साराभूमी परिसर, बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी १, राजवाडा, गंगापूर २, इंदिरा नगर, वैजापूर १, इंगळे वस्ती, वैजापूर १, घायगाव १, परदेशी गल्ली, वैजापूर १, कमलापूर १, अंभई १, प्रसाद नगर, सिल्लोड १, रांजणगाव २

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण 
छावणी १, अन्य ३

Web Title: coronavirus: 101 patients found in Aurangabad district, three die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.