शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या बाजार समितीच्या उपाययोजना कागदावरच; जाधववाडी सुरू करण्याबाबतचा निर्णय अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:25 IST

Jadhavmandi opening decision pending बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही.

ठळक मुद्देआवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीने कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचे दाखविले तर काहीही होणार नाही. कागदोपत्री उपाययोजनांमुळे जाधववाडी सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी जाधववाडी भाजी मंडई सुरू करण्याबाबत बैठक होणार होती. कृउबाच्या पदाधिकारी, प्रशासनाला बैठकीला बोलावले होते; पण बाजार समितीने निर्णय क्षमता असलेले कर्मचारी बैठकीला पाठविले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत मंडई सुरू करण्याचा निर्णय अधांतरी राहिला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, कृउबा समितीचे सभापती पठाडे हे बैठकीला आले नाहीत. बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही. ते काही करत नसतील आणि कागदोपत्री सर्व उपाययोजना दाखवत असतील तर काहीही निर्णय होणार नाही. मार्किंग कसे केले आहे, तेथे भाजी विक्रेते शेतकरी कसे बसणार आहेत, याबाबत जाधववाडीत त्यांनी काय उपाय केले याचे चित्रीकरण करण्यात येईल. त्यांनी नियोजन कागदावर केलेले आहे. त्या आवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

सात सुरक्षा रक्षकांवर १६० दुकानांची जबाबदारीजाधववाडीतील दुकान नं.१ ते १६० पर्यंत चार सुरक्षा रक्षकांवर तर हातगाडी, किरकोळ व्यापाऱ्यांवर नियंत्रणासाठी ३ सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी असल्याचे कार्यालयीन आदेश समितीने काढले आहेत. सोशल डिस्टन्सिंगनुसार फळे व भाजी विक्रीसाठी बसण्यासाठी हे सुरक्षा रक्षक काम करतील. असे त्या आदेशात म्हटले आहे. सात सुरक्षा रक्षक गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न आहे.

सर्व बाबींचे चित्रीकरणासह माहिती घेणारबाजार समितीने सूचनांचे पत्रक काढले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, प्रत्येकाने मास्क लावणे, मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर हाताला लावणे, हात धुण्यासाठी बाजार समिती आवारात व्यवस्था केलेली आहे, तेथे प्रत्येकाने हात धुवावेत. रेखांकन केलेल्या जागेवरच शेतमाल खरेदी-विक्री करावा. मनपाने मुख्य बाजार आवारात लावलेल्या कॅम्पमधये अ‍ॅण्टीजेन आणि आरटीपीसीआरची टेस्ट करणे प्रत्येकास बंधनकारक असेल. बाजार आवारात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी-विक्री होऊ नये. किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजार आवारात बंदी असून त्यांनी आपापल्या भागात हातगाडी किंवा नजीकच्या भाजीमंडईत शेतमाल खरेदी करावा. या सूचना बाजार समितीने केल्या असून त्याची शहानिशा जिल्हा प्रशासन चित्रीकरणासह करणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद