लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:04 IST2021-04-04T04:04:47+5:302021-04-04T04:04:47+5:30
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ६० ते ८५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात कोरोनामुळे ...

लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होतोय
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ६० ते ८५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात कोरोनामुळे तीन वर्षीय चिमुकली रागावल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या संसर्गाच्या मुद्द्यावर आरोग्य यंत्रणाही चिंतेत आहे. मागील वर्षभरात लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यल्प पाहायला मिळाले.
लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पूर्वीपासूनच शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मागील वर्षभरात इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात आले नाहीत. खासगी शिकवणी सुद्धा बंद करण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात कोरोना झपाट्याने पसरत आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. सध्या पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, शहराचा मृत्यूचा आकडा अफाट वाढलेला आहे. दररोज २० ते २८ रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यात लहान मुलांचा आहे आता समावेश झाला आहे. १० मार्चपर्यंत शहरात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अत्यंत कमी प्रमाणात होता. मागील आठ दिवसांमध्ये लहान मुलांमधील संसर्ग दहा पटीने वाढला आहे.
खबरदारी, नियमांचे कठाेर पालन हाच उपाय
लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेण्याचे शक्यतो टाळावे. लहान मुले बाहेर नेताना मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टन्स राखला गेला पाहिजे. सर्व नियमांचे पालन केल्यास लहान मुलांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
पॉझिटिव्ह येणाऱ्या लहान मुलांची संख्या
तारीख - वयोगट - पॉझिटिव्ह संख्या
१० मार्च - ० ते ५ - ८
५ ते १८- ३५
२८ मार्च - ० ते ५ - ५
५ ते १८ - ५८
२९ मार्च - ० ते ५ - ११
५ ते १८ - ५८
३० मार्च - ० ते ५ -९
५ ते १८ - ५८
३१ मार्च - ० ते ५ - ७
५ ते १८-९०
१ एप्रिल - ० ते ५ - ४
५ ते १८ -७३
२ एप्रिल- ० ते ५ -१०
५ ते १८ - ६०