कोरोनाने नेत्र चिकित्सा अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:03 IST2021-05-08T04:03:26+5:302021-05-08T04:03:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी तसेच औरंगाबाद जिल्हा नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे ...

Coronane Ophthalmology Officer | कोरोनाने नेत्र चिकित्सा अधिकारी

कोरोनाने नेत्र चिकित्सा अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी तसेच औरंगाबाद जिल्हा नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार आराख (वय ५५, रा. तक्षशिला नगर, हर्सूल) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर एन ११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी, २ मुलगे, मुलगी, सून, नातू आणि २ भाऊ, बहीण असा परिवार आहे.

ते उत्कृष्ट गायक, अभिनेते होते. मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकाही त्यांनी साकारल्या होत्या. मातीचा लढा, दंगल हे त्यांचे चित्रपट प्रसिद्ध होते. सिल्लोड, सोयगावसह दुर्गम भागात त्यांनी सेवा बजावली. कोरोना काळातही त्यांनी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. ते शिबिरात शस्त्रक्रियेआधी व नंतर रुग्णांची सर्व जबाबदारी पार पाडत असत. त्यांना शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे संघटनेचे प्रमुख डाॅ. महेश वैष्णव यांनी सांगितले.

Web Title: Coronane Ophthalmology Officer