विवाह सोहळ्यांवर यंदाही असेल कोरोनाचे सावट
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:14+5:302020-12-04T04:08:14+5:30
कोरोना गेल्यावर थाटामाटात लग्न लावण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांना तसेच विवाहादरम्यान कोरोनाचा प्रसार नको, खर्च तेवढाच पण नातेवाईक कमी होऊ ...

विवाह सोहळ्यांवर यंदाही असेल कोरोनाचे सावट
कोरोना गेल्यावर थाटामाटात लग्न लावण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांना तसेच विवाहादरम्यान कोरोनाचा प्रसार नको, खर्च तेवढाच पण नातेवाईक कमी होऊ नयेत, अशा प्रकारचा विचार करणाऱ्या वर-वधूच्या पालकांवर येत्या काळात देखील लग्न सोहळे लांबणीवर टाकावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच लग्नाच्या तिथी यंदा कमी आहेत. तुळशी विवाहापासून अर्थात २७ नोव्हेंबर ते २७ जुलै २०२१ या कालावधीत ५३ विवाह मुहूर्त आहेत. सर्वाधिक मुहूर्त मे महिन्यात आहेत, तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुहूर्तांचे प्रमाण कमी असल्याने यावर्षी विवाह कमीच होणार हे निश्चितच. त्यात शासनाच्या नियमानुसार लग्नकार्य उरकावे लागणार आहेत.
महिन्यानुसार असे असतील विवाह मुहूर्त : डिसेंबर : ७,८,९,१७,१९,२३,२४,२७. जानेवारी २०२१ : ३, ५ ,६, ७ ,८, ९, १०. फेब्रुवारी : १५,१६. मार्च : गुरूचा अस्त असून या महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. एप्रिल : २२,२४,२५,२६,२८,२९,३०. मे : १,२,३, ४,५,८,१३,२०,२१,२२,२४,२६,२८,३०,३१. जून : ४,६,१६,१९,२०,२६,२७,२८. जुलै : १,२,३,१३ या तारखेला विवाह मुहूर्त आहेत, असे पुरोहीत रेवनाथ गुरुजी यांनी सांगितले.