शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाबद्दल स्युमोटो याचिका; बातम्यांची खंडपीठाने घेतली स्वतःहून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:01 IST

कोरोनाबद्दलच्या विविध विषयांवर मागील पंधरवड्यात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची खंडपीठाने दखल घेतली आहे.

ठळक मुद्देस्युमोटो याचिकेवर सोमवारी होणार सुनावणीॲड. सत्यजित बोर अमिकस क्युरी म्हणून नियुक्त

औरंगाबाद : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली प्रचंड संख्या आणि रुग्णांच्या उपचारांतील विविध त्रुटीं संदर्भातील ‘लोकमत’सह इतर दैनिकातील बातम्यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी यू. देबडवार यांनी सोमवारी (दि. २२) स्वतःहून दखल घेत स्युमोटो याचिका म्हणून दाखल करून घेतली आहे.खंडपीठाने ॲड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाचे मित्र अमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. ते रीतसर याचिका तयार करून खंडपीठात दाखल करतील. या स्युमोटो याचिकेवर सोमवारी (दि.२६) दुपारी अडीच वाजता ‘ऑनलाईन’ सुनावणी होणार आहे.

शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती प्रचंड संख्या, मृत्युदर, मृत्यू प्रमाणपत्रासाठी आणि अंत्यविधीसाठी नातेवाइकांची होणारी धावपळ, प्राणवायू आणि रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता आणि होणारा काळाबाजार, फसवणूक, गंभीर रुग्ण व त्याचे नातेवाईक यांची आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या रुग्णालयातील बेडसाठी होणारी धावपळ, कोविड सेंटरमधील सोयी-सुविधांचा अभाव, डॉक्टर, परिचारिका, सेवक, आदी कोविड योद्धयांना येणाऱ्या अडचणी आणि त्रास, लसीकरण, आदी विविध विषयांवर मागील पंधरवड्यात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची खंडपीठाने दखल घेतली आहे. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहतील.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या