शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

Corona Virus : म्युकरमायकोसिसचा विळखा; मराठवाड्यात कोरोना न झालेल्यांनाही आजाराने घेरले, एकूण ७०१ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:41 IST

म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अ‍ॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात.

ठळक मुद्देऔरंगाबादेत सर्वाधिक ३३७ रुग्ण २१०३ इंजेक्शनची रोज मागणी

औरंगाबाद : कोरोना या संसर्गजन्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस तथा ब्लॅक फंगस (काळी बुरशी) या आजाराने घेरण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचा हळूहळू मराठवाड्यात विळखा घट्ट होऊ लागला असून, आजवर ७०१ रुग्णांची नोंद विभागात झाली आहे.

सर्वाधिक ३३७ रुग्ण मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना न झालेल्या १०४ जणांनादेखील या आजाराने घेरले असून, हे सर्व रुग्ण नांदेड जिल्ह्यातील आहेत, तर उर्वरित ५९७ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना हा आजार झाला आहे.विभागीय प्रशासनाने म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी काम करीत आहेत. आजारांच्या लक्षणांपासून उपचार पद्धती, औषधी या बाबींची माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ३८३ रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ३२ सरकारी, तर १८२ रुग्ण जीएमसीमध्ये आहेत. खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वाधिक रुग्ण अ‍ॅडमिट आहेत.

नांदेड जिल्ह्यात १०४ नॉनकोविड रुग्णनांदेड जिल्ह्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये १८, तर जीएमसीमध्ये ८६ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे रुग्ण नॉनकोविड आहेत. त्यांना कोरोना झालेला नव्हता. मात्र, ते म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या विळख्यात आले.

२१०३ इंजेक्शनची रोज मागणीम्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अ‍ॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात. सध्या विभागात असलेल्या रुग्णांना रोज २१०३ इंजेक्शनची गरज आहे. मात्र, ५०० च्या आसपास इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी येत आहेत. इंजेक्शनच्या १०० ते २०० व्हायल्स औरंगाबादेत येत आहेत. उर्वरित जिल्ह्यात कमी-अधिक पुरवठा होतो आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे रुग्ण, नातेवाईक या इंजेक्शनसाठी प्रचंड धावपळ करीत आहेत.

कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झालेले रुग्णऔरंगाबाद ३३७जालना ३६बीड ६९लातूर ८१परभणी ४हिंगोली १२नांदेड ५१उस्मानाबाद ७एकूण ५९७ १०४= ७०१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा