शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोरोनाचा फटका : निर्यात बंद झाल्याने तांदूळ स्वस्त; बासमतीचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 1:39 PM

निर्यातीअभावी बासमतीचे भाव क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी गडगडले आहेत.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात भाव कमी होण्याची पहिलीच वेळ

औरंगाबाद : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात थंडावली आहे. निर्यातीअभावी बासमतीचे भाव क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी गडगडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव कमी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.  

घाऊक बाजारपेठेत पूर्वी ९००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या प्युअर बासमतीचे भाव गडगडून सध्या ६५०० ते ९००० रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे. देशात बासमती धानचे उत्पादन चांगले झाले. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये तेथील सरकारने अन्नधान्य प्रशासनाने खाद्यपदार्थ निर्जंतुक जंतुनाशकाच्या नियमावलीमध्ये बदल केला. इराण व युरोपच्या निर्यातीच्या धोरणामध्ये बदल झाल्यामुळे बासमतीचा निर्यातीवर परिणाम झाला. यामुळे सुरुवातीलाच बासमतीचे भाव १ हजार रुपयांनी कमी झाले होते. त्यात आता कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांनी आयात बंद केली. त्याचा परिणाम देशातून होणाऱ्या बासमती निर्यातीवर झाला.

यामुळे मागील १० दिवसांत आणखी दीड ते दोन हजार रुपयांनी बासमतीचे भाव घसरले. एवढेच नव्हे तर नॉन बासमतीच्या भावातही क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घसरण होऊन आजघडीला ३८०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल विकले जात आहे. याआधी नॉन बासमती तांदळाला निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी ५ टक्के सबसिडी यंदा केंद्र सरकारने बंद केली आहे. परिणामी, खुल्या बाजारात धानचे दर कोसळले. यामुळे सुरुवातीला नॉन बासमती तांदळाचे भावही घटले होते, अशी माहिती व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. यंदा ग्राहकांना कमी किमतीत बासमतीच्या भाताची चव चाखता येणार आहे. 

पशुखाद्यासाठी मका, ज्वारी, बाजरीला मिळेना खरेदीदार कोरोनामुळे पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या खड्ड्यात गाडून टाकण्यात येत आहेत. याचा परिणाम पशुखाद्य असलेल्या मका, हायब्रीड ज्वारी व बाजरीवर झाला आहे. मागणी घटल्याने ८ दिवसांत मक्याचे भाव क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांनी कमी होऊन शुक्रवारी ११०० ते १३०० रुपये विकले जात होते.४महिनाभरापूर्वी हाच मका १६०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला गेला होता. औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला सुमारे दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक मक्याचा साठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येथून मका पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, चाळीसगाव, धुळे आदी ठिकाणच्या पोल्ट्री उद्योगासाठी जात होता. पशुखाद्यासाठी वापरणारी ज्वारी, बाजरीचे भाव क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांपर्यंत कमी होऊन १४०० रुपयांवर आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार