शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

corona virus : औरंगाबादमधील पहिल्या कोरोना संशयिताचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:21 PM

इन्फ्लुएंझा आणि सीओव्हीआयडी-१९ दोन्ही तपासण्या निगेटिव्ह

ठळक मुद्देएनआयव्हीच्या अहवालाने औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास खबरदारीचा उपाय म्हणून १०० खाटांच्या आयसोलेशन सेंटरची तयारी

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना संशयित १६ वर्षीय पहिला रुग्ण बुधवारी (दि.११) दाखल झाला होता. त्याच्या लाळेच्या (स्वॅब) नमुन्यांचा तपासणी अहवाल पुणे येथील एनआयव्हीकडून शुक्रवारी (दि.१३) प्राप्त झाला. त्यात इन्फ्लुएंझा आणि सीओव्हीआयडी-१९ दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्याने औरंगाबादकरांसह रुग्णाच्या नातेवाईक, घाटीतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

कोरोनाचा भयगंड असतानाच पहिला रुग्ण दाखल झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. १६ वर्षीय (रा. मीरपूर, उत्तर प्रदेश) मुलगा दिल्लीहून शहरात भावाला भेटण्यासाठी आला होता. प्रवासातून आल्यावर तो तापाने फणफणला आणि त्याचा गळाही बसला होता. शिवाय त्याला दम लागत होता. ही कोरोनाची लक्षणे असल्याने नातेवाईकांसह त्याने घाटी गाठली. त्याला रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला भरती करून कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉ. सुंदर कुलकर्णी व त्यांच्या पथकाने लाळेचे नमुने घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास एनआयव्हीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या सूचनेप्रमाणे रुग्णास  मेडिसिन इमारतीतीत आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. 

१०० खाटांच्या आयसोलेशन सेंटरची तयारी सीव्हीटीएस इमारतीत २२ खाटांचा वॉर्ड तयार केलेला असताना खबरदारीचा उपाय म्हणून घाटीत आणखी १०० खाटांच्या आयसोलेशन सेंटरची तयारी सुरू आहे. जुन्या मूत्रपिंडविकार विभागाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील ३१ खोल्यांसह चार वॉर्डांत ही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी खाटांसह गाद्यांची व्यवस्था केली जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, उपअधीक्षक डॉ. विकास राठोड म्हणाले. शिवाय ट्रिपल लेअर मास्कचा तुटवडा असल्याने वस्त्रभंडार विभागाला ५०० मास्क बनविण्याच्या सूचना दिल्या असून, पीपीडीऐवजी सध्या एचआयव्ही कीटचा वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

नोंदणी अन् खबरदारीवर लक्षवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी समन्वय साधण्यासाठी नोडल आॅफिसर म्हणून उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे यांची नेमणूक केल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. डॉ. डोईबळे व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सीव्हीटीएस इमारतीला भेट देत मदत कें द्रातील मेडिसिनच्या निवासी डॉक्टरांना नोंदणी व खबरदारीसंदर्भात सूचना दिल्या, तसेच सध्या सीव्हीटीएस इमारतीत काम करणारे घाटीचे १५ व मिनी घाटीचे ५, अशा २० कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी चार्टची माहिती इन्चार्ज सिस्टरकडून घेतली.च्संशयित रुग्णांना मिनी घाटीत पाठवताना किमान मास्क उपलब्ध करून देण्याची विनंती डॉक्टर करीत होते, तसेची पीपीडी व एन ९५ मास्कची मागणी परिचारिका व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी डॉ. डोईबळे यांच्याकडे करून अडचणी सांगितल्या. त्यावर अडचणी सांगू नका. फक्त काम करा. रुग्णांना चांगली वागणूक द्या. नोंदी व्यवस्थित घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी