शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

corona virus कोरोना दहशत : हुर्रे....दक्षतेसाठी शाळांना देण्यात आलेल्या सुटीने बच्चे कंपनी खुश, पालकांना मात्र धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:39 PM

परीक्षांमुळे मार्च महिना खरेतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तणाव देणारा ठरत असतो.

ठळक मुद्देपरिस्थिती पाहून परीक्षेचा निर्णयपालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.स्कूल बसचालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया

औरंगाबाद : कोरोनाच्या दहशतीखाली अवघे जग आले आहे. तर कोरोनामुळे शाळांना मिळालेल्या सक्तीच्या सुट्यांमुळे मात्र शहरातील लहान बालके भलतेच खुश दिसत आहेत. परस्परविरोधी असणारे हे चित्र सुटीची बातमी कळताच घराघरांत दिसून आले. 

परीक्षांमुळे मार्च महिना खरेतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तणाव देणारा ठरत असतो. ‘परीक्षा जवळ आली आहे, अभ्यासाला बसा’ असे पालुपद विद्यार्थ्यांना या काळात सतत ऐकावे लागते. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक दिले होते. यानुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होणार होती. मात्र सुट्यांचा शासन निर्णय आल्यामुळे परीक्षा होणार की नाही किंवा पुढे ढकलणार याबाबत सगळीच अनिश्चितता आहे.

सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले असून, त्यांना सुट्याही लागल्या आहेत. तर काही शाळांच्या परीक्षा संपत आल्या असून, अवघे एक- दोन विषयांचे पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता उरलेले एक- दोन पेपर कधी होणार? याबाबतही पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.कर्नाटक राज्यात कोरोनाच्या धास्तीमुळे तेथील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेतलेला आहे. तेथील इयत्ता पहिली ते सहावीच्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि इतर शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, मागे झालेल्या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून जूनमध्ये सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळेला येण्याचे आदेश कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार आपल्याकडेही असे होऊ शकते का? अशी      चर्चाही  पालक मंडळी करतांना दिसत होती. 

स्कूल बसचालकांकडून संमिश्र प्रतिक्रियाशाळांना सुटी लागल्यामुळे काही स्कूल बस चालकही सध्या आनंदी आहेत. काही जण प्रथम सत्र किंवा द्वितीय सत्रातील महिन्याची फीस एकरकमी घेतात. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती नाही. उलट आता शाळांना सुट्या असल्यामुळे पेट्रोल बचत होईल, असे सांगत बहुतांश वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला. तर महिन्याची फीस महिन्याच्या शेवटी घेणाऱ्या वाहनचालकांनी मात्र व्यवसायाला फटका बसणार म्हणून चिंता व्यक्त केली आहे. 

परिस्थिती पाहून परीक्षेचा निर्णयसध्या तरी ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा शासन निर्णय आहे. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच ३१ मार्चनंतर नेमके काय करायचे हे ठरविले जाईल. पुढील काही दिवसात कोरोनामुळे नेमकी काय स्थिती असेल, यावर सगळे अवलंबून आहे. एप्रिल महिना हा परीक्षेचाच असतो. त्यामुळे होम एक्झामसाठी एप्रिलमध्ये वेळ आहे. पण तरीही परिस्थितीचा फेरआढावा घेऊनच सगळ्या राज्याला लागू होणारे धोरण जाहीर करण्यात येईल. सध्या तरी परीक्षा रद्द झाल्या आहेत का? एप्रिलमध्ये होतील किंवा नाही? याबाबत काहीच सांगता येणार नाही. -बी. बी. चव्हाण, शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग)