शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 16:55 IST

corona virus : जिल्ह्यात १८३ नव्या रुग्णांची वाढ : शहरात दीडशेपार रुग्ण, ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोनाने (corona virus ) हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या चार दिवसात ग्रामीण भागात नव्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात १८३ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील तब्बल १५१ आणि ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी २८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील २४ आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २८५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात चार दिवसांपूर्वी २४ तासांत १६ रुग्णांचे निदान झाले होते. शुक्रवारी ३२ रुग्ण वाढले. शहरातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढ होत असून, नव्या रुग्णांची संख्या दीडशेपार गेली आहे.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी होस्टेल २, खडकेश्वर १, घाटी १, मिल्ट्री हॉस्पिटल १, रेल्वे स्टेशन १, संभाजी कॉलनी १, शिवकृपा कॉलनी १, ईटखेडा २, मकाई गेट १, नंदनवन कॉलनी १, वसुंधरा कॉलनी २, न्यू पहाडसिंगपुरा १, एन- वन येथे २, रामनगर १, करीम कॉलनी १, व्यंकटेशनगर १, कटकट गेट १, जाधववाडी १, एन- पाच येथे २, पिसादेवी १, एन- सात येथे ३, ज्योतीनगर १, हनुमाननगर १, आकाशवाणी १, गारखेडा परिसर २, समर्थनगर १, छत्रपतीनगर १, एमआयटी कॉलेज १, सातारा परिसर १, वेदांतनगर १, एसबी कॉलनी १, बीड बायपास २, गादिया विहार २, देवगिरी गर्ल्स होस्टेल १, श्रेयनगर ३, नंदनवन कॉलनी १, छावणी १, शिवाजीनगर १, जवाहर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक १, गजानन कॉलनी १, एन- चार येथे ४, ठाकरेनगर १, हर्सूल १, सिडको टाऊन सेंटर १, एअरपोर्ट स्टाफ १, रामनगर १, शहानूरवाडी १, क्रांती चौक १, कोकणवाडी १, बन्सीलाल नगर १, टिळकनगर १, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर ४, रोशन गेट १, समर्थनगर २, कांचनवाडी १, महूनगर १, अन्य ७५.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगबाद ११, फुलंब्री ४, गंगापूर ४, कन्नड ४, खुलताबाद १, सिल्लोड १, वैजापूर ३, पैठण ४

ग्रामीण भागातील स्थितीतारीख-नवे रुग्ण१ जानेवारी-१०२ जानेवारी-७३ जानेवारी-८४ जानेवारी-१६५ जानेवारी-१७६ जानेवारी-१७७ जानेवारी-३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद