शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

corona virus : मराठवाड्यात दिलेल्या व्हेंटिलेटरचा ऑडिट अहवाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 13:29 IST

corona virus : एकमेकांवर टोलवी - टोलवी करण्याच्या प्रकरणात अंतर्गत राजकारणाला ऊत आला असून, कोरोना रुग्णांना पंतप्रधान सहायता निधीतून आलेल्या व्हेंटिलेटरचा कधी व किती फायदा होणार, हा प्रश्नच आहे.

ठळक मुद्दे अहवाल न देण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर दबावव्हेंटिलेटर प्रकरणात सगळी यंत्रणा घाटी प्रशासनावर खापर फोडून मोकळी होत आहेेे.आरोग्य विभागाकडून याबाबत अद्याप काहीही अभिप्राय आलेला नाही.

औरंगाबाद : पंतप्रधान सहाय्यता निधीतून औरंगाबादसाठी आलेल्या १५० पैकी ५५ व्हेंटिलेटर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत देण्यात आले आहेत. तसेच थेट जिल्ह्यांना दिलेले व्हेंटिलेटर चालू आहेत की बंद, याचा कोणताही अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने देऊ नये, यासाठी दबावतंत्राचे राजकारण प्रशासनांतर्गत सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्यासाठी आजपर्यंत शासनातर्फे कोणतीही समिती वा टीम व्हेंटिलेटरच्या ऑडिटसाठी आलेली नसल्याचे समजते.

व्हेंटिलेटर प्रकरणात सगळी यंत्रणा घाटी प्रशासनावर खापर फोडून मोकळी होत आहेेे. मात्र, आरोग्य विभागाकडून याबाबत अद्याप काहीही अभिप्राय आलेला नाही. एकमेकांवर टोलवी - टोलवी करण्याच्या प्रकरणात अंतर्गत राजकारणाला ऊत आला असून, कोरोना रुग्णांना पंतप्रधान सहायता निधीतून आलेल्या व्हेंटिलेटरचा कधी व किती फायदा होणार, हा प्रश्नच आहे. मराठवाड्यात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दिलेल्या व्हेंटिलेटरचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे. २७ एप्रिल, १ मे आणि १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात आले, तर विभागीय आयुक्तालयाने हिंगोलीत १५, बीडमध्ये १०, उस्मानाबादला १५, परभणीत १५ असे ५५ व्हेंटिलेटर दिले. येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदरील व्हेंटिलेटर इन्सटॉल (स्थापित) केले की नाही, त्याचा अहवाल अद्यापही आला नसल्याचे पत्र उपायुक्त जगदीश मिनियार यांनी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी २७ एप्रिल रोजी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला ५, एमजीएम हॉस्पिटलला २० असे २५ व्हेंटिलेटर दिले. यानंतर १ मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला ३ आणि एचएमजी हॉस्पिटलला ३ व्हेंटिलेटर त्यांनी दिले. १० मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला पुन्हा १० व्हेंटिलेटर देण्यात आले.

सगळेच व्हेंटिलेटर तपासणारआ. सतीष चव्हाण हे १८ मेपासून मराठवाड्यात देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची तपासणी सुरू करणार आहेत. प्रत्येक जिल्हा चिकित्सकांकडून व्हेंटिलेटर स्थापित केल्यानंतर काय अडचण आली, याची लेखी माहिती ते घेणार आहेत. आरोग्य विभागाने व्हेंटिलेटरचे ऑडिट आजवर करणे अपेक्षित होते. परंतु ते का झाले नाही, याबाबत आ. चव्हाण यांनी शंका उपस्थित केली.

व्हेंटिलेटर आल्यानंतरचा प्रवास असा : ६ एप्रिल रोजी १५० व्हेंटिलेटर आले.१२ एप्रिल रोजी धमन-३ कंपनीचे १०० नग आले.१८ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर इन्सटॉल केले.२० एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी आढळल्या.२३ एप्रिल रोजी २ दुरूस्त केले, ते पुन्हा बिघडले.२३ एप्रिल रोजी विभागीय आयुक्तांनी ५५ची मागणी केली.२७ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.६ मे रोजी धमन-३ च्या व्हेंटिलेटरचे इन्स्पेक्शन झाले.१० मे रोजी व्हेंटिलेटरवरून राजकारण तापण्यास सुरूवात.१४ मे रोजी कंपनी अभियंता रिपोर्ट न देता निघून गेले.१७ मे रोजी यावरून शिवसेना-भाजपचे राजकारण सुरु.१८ मे रोजी ५५ व्हेंटिलेटरची उलटतपासणीची मागणी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा