शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ४१० दिवसांत ३,००५ कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 12:20 PM

Corona Virus : गुरुवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, ३१ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात ८१ दिवसांत मृत्यू झाले दुप्पट  सध्या जिल्ह्यात ६,२६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५८९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील सात रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या ४१० दिवसांत कोरोनाने ३,००५ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या सहा हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर दररोज मृत्यूसत्र चालले. काही काळ मृत्यूचक्र थांबले. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले. जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण एक हजार २६८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकूण मृत्यूची ही संख्या गुरुवारी ३,००५ झाली. गेल्या ८१ दिवसांत एक हजार ७३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३९ हजार १४३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २९ हजार ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ५३० नव्या रुग्णांत शहरातील १९०, तर ग्रामीण भागामधील ३४० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११७ आणि ग्रामीण भागातील ४७२ अशा ५८९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाळूज येथील ४६ वर्षीय पुरुष, औरंगपुरा येथील ३२ वर्षीय पुरुष, जैतापूर, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७० वर्षीय पुरुष, आवडे उंचेगाव, पैठण येथील ८२ वर्षीय महिला, पिंपरी, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, नंदनवन काॅलनीतील ६१ वर्षीय महिला, बिडकीन येथील ७० वर्षीय महिला, शहरातील ५० वर्षीय महिला, गेवराई, पैठण येथील ७९ वर्षीय महिला, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, एन-७ येथील ३४ वर्षीय पुरुष, शांडनेरवाडी, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, छावणीतील ५५ वर्षीय महिला, बोरुडी, वैजापूर येथील ६१ वर्षीय महिला, दमानी खुर्द, कन्नड येथील ४८ वर्षीय महिला, वाकी कदीम, कन्नड येथील ३० वर्षीय महिला, टाकळी अंबड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, बाजारसावंगी, खुलताबाद येथील ३५ वर्षीय महिला, शांतीपुरा, लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, चौराहा येथील ७० वर्षीय पुरुष, देवळाई रोड, साईनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, एन-९ येथील ६८ वर्षीय पुरुष, प्रतापनगर येथील ६६ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ३, सातारा परिसर १, शिवाजीनगर ३, बीड बायपास ८, गारखेडा परिसर ५, नारेगाव २, शहागंज २, अजबनगर १, न्यू नंदनवन कॉलनी १, बन्सीलालनगर १, चिकलठाणा ३, मिलेनिअर पार्क, एमआयडीसी २, एन-२ येथे ४, जयभवानीनगर २, हनुमाननगर १, परिजातनगर ३, जाधववाडी १, लक्ष्मी कॉलनी १, रामनगर ३, हर्सूल ३, संजयनगर १, राजनगर २, न्यायनगर १, एन-४ येथे १, पुंडलिकनगर २, भारतमाता कॉलनी १, जवाहर कॉलनी २, शास्त्रीनगर १, नंदनवन कॉलनी १, विशालनगर १, नवनाथनगर १, प्रसन्नदत्त पार्क १, आलोकनगर २, भावसिंगपुरा १, पेठेनगर २, होळकर चौक १, एन-६ येथे २, बजरंग चौक १, सनी सेंटर १, एन-८ येथे १, एन-७ येथे २, एन-९ येथे ४, सुरेवाडी ४, म्हसोबानगर १, मयूर पार्क ८, एन-३ येथे २, वानखेडेनगर १, जयसिंगपुरा १, एन-१२ येथे १, घाटी परिसर १, कैलाशनगर १, बेगमपुरा १, खोकडपुरा १, बंजारा कॉलनी १, कांचनवाडी ३, द्वारकानगर २, गजानन मंदिर परिसर १, पडेगाव २, प्रतापनगर १, होनाजीनगर १, अब्दुलशहानगर १, विश्राम कॉलनी १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, घाटी ३, अन्य ६९.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १०, वडगाव कोल्हाटी ६, सिडको वाळूज महानगर २, वाळूज २, बोकनगाव १, पिसादेवी १, गोळेगाव, ता. खुलताबाद १, गेवराई १, भारेगाव १, वाळूज मोहटादेवी मंदिर १, बोरगाव, ता. गंगापूर १, कन्नड १, शेलगाव, ता. कन्नड १, अंधारी, ता. सिल्लोड १, वाघाडी, ता. पैठण १, शेंद्रा १, तांडा बालानगर १, पैठण २, वळदगाव १, जिकठाण, ता. गंगापूर १, ममतापूर, ता. गंगापूर १, दौलताबाद १, पिशोर, ता. कन्नड १, सिल्लोड १, खासगाव १, वागदी ता. पैठण १, अन्य २९७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू